Fortuner Car Dealership Details : कोणत्याही सामान्य कुटुंबासाठी कार खरेदी करणं एक स्वप्नच असतं. पण जर एखाद्या कुटुंबाने फॉर्च्यूनरसारखी मोठी कार खरेदी करायचं ठरवलं, तर हे स्वप्न पूर्ण करण्यात आणखी समस्या निर्माण होतात. खरंतर भारतीय बाजारात गाड्यांची किंमत इतकी जास्त आहे की, कोणत्याही सामान्य माणसाला ती गाडी खरेदी करणं अवघड वाटतं. अशातच आता एक प्रश्न उपस्थित झाला आहे की, अखेर या गाड्या इतक्या महाग का असतात? एक कार विक्री केल्यानंतर तीन लोकांना फायदा होतो. कार बनवणाऱ्या कंपनीला, डीलर आणि त्यानंतर भारत सरकारला याचा फायदा होतो. यामध्ये सर्वात जास्त फायदा सरकारचाच होतो. म्हणूनच गाड्या सामान्य लोकांना खूप महागड्या वाटतात. जाणून घेऊयात यामागचं संपूर्ण गणित.
फॉर्च्यूनरच्या माध्यमातून समजून घ्या हे गणित
सध्याच्या घडीला दिल्लीत एका फॉर्च्यूनरची किंमत तिच्या वेरिएंटनुसार पाहिलं तर ३८ ते ६० लाख रुपये आहे. जर फॉर्च्यूनर एखाद्या शो रुममधून विक्री केली जाते, तेव्हा भारत सरकारला, कंपनी आणि डीलरला किती पैसै मिळतात याचं संपूर्ण गणित तुम्हाला टॅक्सेशन विथ सीए साहिल जैन नावाच्या चॅनेलवर मिळेल. त्यांच्याच रिपोर्टनुसार आम्ही तु्म्हाला सांगत आहोत की, तिघांना किती फायदा होईल.
त्यांच्या माहितीनुसार, एक फॉर्च्यूनरची विक्री केल्यावर कंपनीला ३५ ते ४० हजार रुपयांचा फायदा होतो. तर डीलर एका फॉर्च्यूनरची विक्री करून जवळपास एक लाख रुपयांचा नफा मिळवतो. पण सरकारला एक फॉर्च्यूनर विकल्यानंतर जवळपास १८ लाख रूपयांचा नफा होतो. यामध्ये टॅक्ससोबतच गाडी खरेदी करताना जी प्रोसेस केली जाते, त्याचेही चार्जेस लागतात. कारण शेवटी सरकारच्याच खात्यात सर्व पैसै जमा होतात.
सरकारला इतका फायदा कसा होतो?
गाड्यांची विक्री केल्यानंतर सरकारला सर्वात जास्त फायदा जीएसटीमुळे होतो. टॉप मॉडेल फॉर्च्यूनरची विक्री केल्यावर सरकारला जवळपास ४३ टक्के जीएसटी मिळतो. इंडियन ऑटो ब्लॉग्सनुसार, फॉर्च्यूनरच्या टॉप मॉडेलवर २८ आणि १५ टक्के जीएसटी लागतो. याचसोबत रजिस्ट्रेशन, लॉजिस्टिक्स, फास्टॅग, ग्रीन सेस, टीसीएस, विमा आणि एक्सटेंडेड वॉरंटीसाठी ग्राहकांना पैसै भरावे लागतात. हे सर्व पैसे सरकारच्या खात्यावर जमा होतात.