scorecardresearch

रेल्वेने प्रवास करताय, मग कोच आणि बोगीमध्ये काय फरक आहे माहितीये? वाचा अन् संभ्रम दूर करा

कोच आणि बोगीमध्ये नेमका फरक काय आहे, समजून घ्या…

train coach and bogie
रेल्वेच्या कोच आणि बोगीमध्ये काय फरक? (Photo-indian express)

what is difference between train coach and bogie: प्रवाशांचा प्रवास अधिक सोपा व सुखकर होण्यासाठी रेल्वेच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या सोयी सुविधा पुरवल्या जातात. फर्स्ट एसी ते जनरल डब्यापर्यंत प्रत्येक वर्ग आपापल्या परीने प्रवास करू शकतो. मात्र, तुम्हाला बोगीने प्रवास करायचा आहे की कोचने, असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का? आता तुम्ही म्हणाल ही रेल्वेची ‘बोगी आणि कोच’ काय भानगड आहे? प्रवास तर रेल्वेनेच करायचा असतो ना! तर मित्रांनो, इथेच अनेकांची फसगत होते, अनेकांना याबद्दलची सविस्तर माहिती नसल्याने कोचला बोगी म्हणतात आणि बोगीला कोच म्हणतात. तर हाच आपला संभ्रम दूर करण्यासाठी ही महत्वाची माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय, वाचा मग….

‘कोच’ म्हणजे नेमकं काय?

खरतंर कोच आणि बोगी या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. अनेक लोकं कोचला बोगी म्हणतात, पण हे चुकीचे आहे. रेल्वेच्या ज्या डब्यात आपण प्रवास करता त्याला कोच म्हणतात. यामध्ये स्लीपर, एसी टियर १, एसी टियर २, एसी टियर ३ आणि जनरल असे डब्बे असतात. मात्र, अनेकजण बोगीलाच कोच म्हणून संबोधतात, जे चुकीचं आहे.

elders saved the child slife Varanasi Viral Video
VIDEO: पावसाच्या पाण्यात विजेचा धक्का बसल्याने तडफडत होता चिमुकला, देवदूत बनून आलेल्या वृद्धांनी वाचवले प्राण
Pankaja Munde
“माझ्यावर निर्णय घ्यायची वेळ…”, पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर भाजपाची प्रतिक्रिया; म्हणाले…
Anil Parab Supreme Court Rahul Narwekar
“सर्वोच्च न्यायालयाच्या खालचं विधानसभा अध्यक्षांचं न्यायालय प्रत्येक आमदाराची…”, अनिल परबांचं मोठं विधान
Marathi Woman Trupti Devrukhkar Shared video
धक्कादायक! मराठी महिलेला मुंबईत घर नाकारलं, मनसेने इंगा दाखवल्यानंतर माफी, व्हायरल व्हिडीओवर संताप व्यक्त

(हे ही वाचा : अहो आश्चर्यम! देशातील ‘या’ रेल्वे स्थानकावर दररोज प्रवाशी तिकीटं खरेदी करतात, पण प्रवास कोणीच का करत नाहीत? )

बोगी म्हणजे नेमकं काय?

बोगी हा रेल्वे कोचचा एक भाग आहे, ज्यावर डबा बसतो. तुम्हाला दिसणारी रेल्वेची चाके एका बोगीला जोडलेली असतात. बोगी तयार करण्यासाठी चार ते सहा चाके एका एक्सलला जोडलेली असतात, ज्यावर संपूर्ण डबा बसलेला असतो. साधारणता एका कोचमध्ये दोन बोगी असतात.

‘हे’ सुध्दा जाणून घ्या थोडक्यात

बोगी आणि कोच यामध्ये आणखी फरक सांगता येईल. जसं की, चालती रेल्वे थांबवण्यासाठी बोगीमध्येच ब्रेक लावले जातात. रेल्वेच्या प्रत्येक चाकावर ब्रेक बसवलेले असतात, ज्यामुळे संपूर्ण रेल्वे कोणत्याही अडचणीशिवाय एकाच वेळी थांबवता येते.

तर मित्रांनो, आम्ही तुम्हाला कोच आणि बोगी यामधील फरक समजावून सांगितला. तेव्हा आपण आधुनिकतेच्या युगात नेहमी अपडेट रहा त्याचबरोबर सावध रहा आणि सुरक्षित राहा.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-09-2023 at 17:02 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×