International Beer Day: आंतरराष्ट्रीय बिअर दिवस हा दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी साजरा केला जातो. या वर्षी, तो शुक्रवारी, ४ ऑगस्ट २०२३ रोजी आला आहे . हा दिवस जगात उपलब्ध असलेल्या विविध प्रकारच्या बिअरचा वापर करून पाहण्यासाठी, आनंद घेण्यासाठी साजरा केला जातो.

आंतरराष्ट्रीय बिअर दिवस साजरा करणे ही बिअरप्रेमींसाठी मित्र, कुटुंब आणि सहकाऱ्यांसह बिअरचा ग्लास घेऊन चांगला वेळ घालवण्याची संधी आहे. आंतरराष्ट्रीय बिअर दिवस साजरा करण्यामागील मुख्य उद्दिष्टांपैकी एक म्हणजे बिअरच्या विविध प्रकारांना आणि शैलींना प्रोत्साहन देणे, याशिवाय स्थानिक ब्रुअरी(दारुभट्टी)आणि बिअर संस्कृतीतील त्यांची भूमिका यांना समर्थन देणे हा आहे.

आंतरराष्ट्रीय बिअर दिवसाचा इतिहास २००७ चा आहे, ज्या दरम्यान मित्रांच्या एका गटाने सांताक्रूझमध्ये बिअर कार्यक्रम आयोजित केला होता आणि तेव्हापासून हा दिवस जागतिक स्तरावर साजरा केला जातो.

हेही वाचा : जगातली सर्वात महागडी बियर 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

International Beer Day: बीअरबद्दल १० मजेदार गोष्टी जे तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे

  • बिअर हे सर्वात जुने ज्ञात अल्कोहोलिक पेय म्हणजेच मद्य आहे. पहिली बिअर प्राचीन सुमेरियन (Sumerians) लोकांनी तयार केली होती.
  • बीअर प्राचीन संस्कृतीचे समर्थन करण्यासाठी ओळखली जाते. असे मानले जाते की, पूर्वीचे लोक त्यांच्या दैनंदिन आहारात बिअर घेत असत, त्याशिवाय ते धार्मिक समारंभ आणि विधींमध्ये वापरत असत.
  • प्रिझर्व्हेटिव्ह(preservatives) म्हणऊन हॉप्स वापरून बीअर जास्त काळ टिकवून ठेवता येते. हॉप्स हे बिअरचे शेल्फ लाइफ वाढवतात जेणे करून ती वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जात येऊ शकते.
  • ७६८ एडी(AD) मध्ये सापडलेली, फ्रीझिंग, बव्हेरिया, जर्मनीमधील वेहेन्स्टेफन ब्रुअरी ( दारु भट्टी) ही जगातील सर्वात जुनी दारूभट्टी(world’s oldest brewery) आहे.
  • बिअरचा रिकामा ग्लास पिण्याच्या भीतीला सेनोसिलिकाफोबिया (Cenosillicaphobia) म्हणतात. जरी, ही वैद्यकीय स्थिती नसली, तरीही लोकांचा यावर विश्वास आहे

हेही वाचा – International Beer Day: बीअर कशी तयार होते माहितेय का? लोकप्रिय ड्रिंकची घरगुती प्रक्रिया पाहून व्हाल थक्क

  • जगातील सर्वात स्टॉंग बिअर ही स्कॉटिश ब्रुअरी ब्रुमेस्टरची “स्नेक व्हेनम” आहे.
  • अल्कोहॉलिक बिअरच्या तुलनेत नॉन-अल्कोहोलिक बिअर बनवणे अवघड असते. अशा बिअर अल्कोहोल काढून टाकून किंवा किण्वन प्रक्रिया करुन तयार केल्या जातात.
  • १८१४ मध्ये लंडनमध्ये द ग्रेट बिअर फ्लड नावाची घटना घडली. या घटनेदरम्यान, म्यूक्स आणि कंपनी ब्रुअरीचा एक मोठा व्हॅट तुटला आणि त्यामुळे, अंदाजे ३,८८,००० गॅलन बिअर रस्त्यावर सोडण्यात आली. या घटनेत ८ जणांचा जीव गेल्याचे समजते
  • अल्टेनबर्ग, जर्मनीमधील एक संग्रहालय सर्वात मोठ्या बिअर निर्मितीसाठी समर्पित आहे.
  • जगातील टॉप पाच बिअर उत्पादक देश अमेरिका, चीन, ब्राझील, जर्मनी आणि रशिया आहेत.