State Bank Of India New Facility : आताच्या घडीला एसबीआयकडून त्यांच्या ग्राहकांना नवनवीन सुविधा दिल्या जात आहेत. याअंतर्गत आता कस्टमर क्यूआर कॅश फंक्शनच्या माध्यमातून कोणत्याही एटीएममधून पैसे काढू शकता. एसबीआयच्या या सुविधेमुळं ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. याचसोबत एसबीआयने त्यांच्या योनो अॅपमध्येही (YONO APP) ही सुविधा अपग्रेड केली आहे. या अपग्रेडेड अॅपच्या माध्यमातून एसबीआय त्यांच्या ग्राहकांना इंटरऑपरेबल कार्डलेस कॅश विड्रॉल (ICCW) ही सुविधा दिली जाईल.
ग्राहक त्यांच्या क्यूआर कॅशच्या कार्यक्षमतेला लक्षात घेऊन एटीएम स्क्रीनवर एक क्यूआर निर्माण करून त्यांच्या यूपीआय अॅप्लिकेशन स्कॅन-एंड-पेच्या सुविधेचा वापर करू शकतात आणि एटीएममधून रोख रक्कम काढू शकतात. या सुविधेमुळं ग्राहकांना असा फायदा होणार की, यामुळे रोख रक्कम काढण्याची प्रोसेस आणखी सोपी होईल. याशिवाय पिन टाकण्याचा आणि डेबिट कार्डच्या हॅंडलिंगची समस्या दूर होईल. तसंच यामुळे कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होणार नाही.
रिपोर्टनुसार, १ जुलै २०२३ ला एसबीआयचे चेअरमन दिनेश खारा यांनी भारताच्या टॉप २१ जिल्हा केंद्रात ३४ बॅकिंग हब लॉन्च केले होते. यामुळे आर्थिक उलाढाल, भरपाई आणि आवश्यक गोष्टींचा हिशोब ठेवण्यात फायदा होतो. खारा यांनी पुढे सांगितलं की, ग्राहकांना या सर्व सुविधा देतानाच डिजीटल माध्यमांना अधिक सोपे करण्यासाठी योनो अॅपला नवीन व्हर्जनमध्ये निर्माण केलं आहे. प्रत्येक भारतीय नागरिकाला योनो मिशनला अजून जास्त वास्तविक करण्यासाठी एसबीआयचं लक्ष्य गाठण्यात मदत होईल. योनो अॅप २०१७ मध्ये लॉन्च केलं होतं. या अॅपचे आतापर्यंत ६० मिलियनहून अधिक रसिस्टर्ड यूजर्स आहेत.