scorecardresearch

Budget 2023 App: केंद्रीय अर्थसंकल्पाचं अधिकृत सरकारी अ‍ॅप कसं डाऊनलोड करायचं? वाचा सोप्या टिप्स…

Budget 2023 App Download Steps : अर्थसंकल्प केंद्र सरकारच्या अधिकृत अ‍ॅपच्या माध्यमातून लाईव्ह समजून घेता येणार आहे. हे अ‍ॅप कोठून आणि कसं डाऊनलोड करायचं याचा हा आढावा…

nirmala-2
निर्मला सीतारमण

Budget 2023 App Download Steps : मोदी सरकार २०२३-२४ चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या अर्थसंकल्पात काय घोषणा करतात आणि त्याचा सर्वसामान्यांच्या दैनंदिन आर्थिक गणितावर काय परिणाम होतो याकडे सर्वांचंच लक्ष आहे. विशेष म्हणजे मोदी सरकारच्या डिजिटल इंडिया मोहिमेचा भाग म्हणून मागील दोन अर्थसंकल्पांप्रमाणे यंदाही केंद्रीय अर्थसंकल्प डिजिटल स्वरुपात जाहीर होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांनाही हा अर्थसंकल्प केंद्र सरकारच्या अधिकृत अ‍ॅपच्या माध्यमातून लाईव्ह समजून घेता येणार आहे. हे अ‍ॅप कोठून आणि कसं डाऊनलोड करायचं याचा हा आढावा…

Budget 2023 : सात लाखांच्या उत्पन्नावर आयकर नाही, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची महत्त्वाची घोषणा

केंद्रीय अर्थसंकल्पाचं अ‍ॅप कसं डाऊनलोड करायचं?

सरकारच्या अधिकृत अ‍ॅपमध्ये अर्थसंकल्पाच्या तरतुदी आणि इतर कागदपत्रांसह अर्थमंत्र्यांचं अर्थसंकल्पीय भाषणही पीडीएफ स्वरुपात उपलब्ध असणार आहे. हे सर्व तुमच्या अँड्रॉईड किंवा अ‍ॅपल मोबाईल/टॅबमध्ये कसं डाऊनलोड करायचं याच्या साध्या-सोप्या स्टेप्स खालीलप्रमाणे…

१. प्रथम केंद्र सरकारच्या indiabudget.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या

२. वेबसाईटला भेट दिल्यावर सर्वात उजव्या बाजूला Download Mobile Application या टॅबवर क्लिक करा.

३. क्लिक केल्यावर तुम्ही केंद्रीय अर्थसंकल्प अ‍ॅप डाऊनलोड सेंटरमध्ये जाल.

४. तुम्ही अँड्रॉईड मोबाईल फोन वापरत असाल तर अँड्रॉईड अ‍ॅप बटनवर क्लिक करा. तुम्ही आयफोन किंवा आयपॅड वापरत असाल तर त्यासाठी अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरवर क्लिक करा.

५. याशिवाय तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करूनही केंद्रीय अर्थसंकल्पाचं अ‍ॅप डाऊनलोड करू शकता.

६. अँड्रॉईड मोबाईलसाठी अ‍ॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा…

७. आयफोन किंवा आयपॅडसाठी अ‍ॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा…

मराठीतील सर्व FYI ( Do-you-know ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-02-2023 at 11:24 IST
ताज्या बातम्या