येत्या काही महिन्यांमध्ये अनेक महापालिकांच्या निवडणुका आहेत. त्यापूर्वी मतदार यादीत नाव नोंदवण्याची प्रक्रिया पार पाडली जाते. तसेच जर मतदार यादीतील नावामध्ये काही चुक असल्यास ती दुरुस्त करण्याची प्रक्रियाही मतदानाआधी पूर्ण करणे आवश्यक असते. यासाठी निवडणुक आयोगाला अर्ज कसा करावा जाणून घ्या.
मतदार ओळखपत्रावरील नाव दुरुस्त करण्याचा अर्ज
- जर मतदार ओळखपत्रावरील तुमच्या नावामध्ये, वडिलांच्या नावामध्ये किंवा आडनावामध्ये, वयामध्ये काही चुक असेल तर तुम्ही ती दुरुस्त करण्यासाठी अर्ज करू शकता.
- यासाठी ‘फॉर्म ८’ चा वापर करावा लागतो.
- या फॉर्मसह जन्माच्या दाखल्याची झेरॉक्स कॉपी जमा करा.
- https://www.nvsp.in/Forms/Forms/form8?lang=en-GB या अधिकृत वेबसाईटवरून याबाबत अधिक माहिती मिळवू शकता.
- या प्रक्रियेबाबत काही शंका असेल तर तुम्ही १९५० या क्रमांकावर फोन करु शकता. (या नंबरपूर्वी तुमचा एसटीडी कोड वापरण्यास विसरू नका.)