आपण आकाशात अनेकदा विमान पाहतो. लहानपणी आपल्याला याचे विशेष कौतुक वाटते. आकाशात लुकलुकणारे दिवे पाहून कित्येक काळ आपण त्याकडे पाहतच बसतो. मग विमानाला कसे पंख असतात. ते आकाशात कसे उडते याबाबत आपण वाचतो किंवा ऐकतोही. पण जगातील जवळपास सगळ्या विमानांचा रंग पांढराच का असतो असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय? नाही ना? पण काही लोकांना हा प्रश्न पडला आणि त्यांनी त्याचे उत्तरही शोधून काढले. तर पाहूयात विमान पांढरे असण्यायामागची नेमकी कारणे काय आहेत ते…

विश्लेषण: विमानात जन्म झाल्यास बाळाला कोणत्या देशाचं नागरिकत्व मिळतं माहितीये का?

पांढरा रंग इतर रंगाच्या तुलनेत उष्णतेला दूर ठेवतो. त्यामुळे कोणत्याही तापमानात विमान थंड रहावे यासाठी विमानाला पांढरा रंग असतो. आकाशात विहार करत असताना विमानाची विशेष काळजी घेणे आवश्यक असते. काळा रंग हा उष्णतेला पूरक रंग आहे. काळ्या रंगामुळे उष्णता मोठ्या प्रमाणात वाढते. याशिवाय विमानाचा रंग पांढरा असण्यामागे आणखी एक महत्त्वाचे कारण आहे. पांढऱ्या रंगामुळे विमानात झालेली खराबी म्हणजेच तेल किंवा ऑइल लिकेज लवकर कळतात.

मध्यरात्री एखाद्या रेल्वे स्टेशनवर उतरून सकाळपर्यंत थांबल्यास प्लॅटफॉर्म तिकिट काढावे लागते का? जाणून घ्या

याशिवाय तज्ज्ञ सांगतात की, विमान रंगवण्यासाठी 50 हजार ते 2 लाख डॉलरपर्यंत खर्च येतो. जर विमान इतर कोणत्याही रंगाने रंगवले असेल तर त्यावरचे ओरखडे फार लवकर दिसू लागतील. तर पांढऱ्या रंगात किंवा स्केचेस लवकर दिसत नाहीत. विमान बनवण्याबरोबरच पेंटिंगवरही खर्च करण्याचा कंपनीचा खर्च वाचतो. त्यामुळे विमानालाही पांढरा रंग दिला आहे.