भारतात लोक सर्वाधिक रेल्वेन प्रवास करतात. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. तसेच रेल्वे प्रवास हा खूप स्वस्तही असतो. आपण प्रवास करताना बऱ्याचदा मध्यरात्री एखाद्या स्टेशनवर उतरतो, सुरक्षा किंवा रात्री प्रवासी वाहनं उपलब्ध नसल्याने स्टेशनवर थांबतो. सकाळ झाल्यावर स्टेशनमधून बाहेर पडतो. अशावेळी स्टेशनवर थांबण्यासाठी आपल्याला प्लॅटफॉर्म तिकिटाची आवश्यकता असते का? याबद्दल जाणून घेऊयात.

हेही वाचा – विश्लेषण: विमानात जन्म झाल्यास बाळाला कोणत्या देशाचं नागरिकत्व मिळतं माहितीये का?

‘एबीपी लाइव्ह’ने दिलेल्या वृत्तानुसार, जर तुम्ही स्टेशनवर रात्री 2 वाजता ट्रेनमधून उतरलात आणि सकाळपर्यंत तिथे थांबावे लागले तर तुम्हाला प्लॅटफॉर्म तिकीट काढावे लागणार नाही. पण, अशा परिस्थितीत तुमच्या मागील प्रवासाचे तिकीट तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. जेणेकरुन गरज असेल तेव्हा ते तिकीट तुम्हाला दाखवता येईल. त्या तिकीटाच्या आधारे तुम्हाला तिथे थांबता येतं, तुम्हाला वेगळं प्लॅटफॉर्म तिकीट काढायची गरज नाही.

हेही वाचा – ट्रेन ‘या’ शब्दाचा फुल फॉर्म माहितेय का? तुमच्या रेल्वे तिकिटावरील ‘या’ अक्षरांचे खरे अर्थ जाणून घ्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खरं तर मध्यरात्री स्टेशनवर थांबणं हा प्रवाशांच्या सुरक्षेशी निगडीत प्रश्न आहे, त्यामुळे रात्री उशिरा ट्रेनचा प्रवास संपवून स्टेशनवर थांबून सकाळची वाट पाहणे हा सुरक्षेच्या दृष्टीने योग्य निर्णय आहे. यासाठी रेल्वे स्थानकावर वेटिंग रूम उपलब्ध असतात. वेटिंग रुममध्ये प्रवाशांसाठी बसण्याची योग्य व्यवस्था केलेली असते. आपल्या प्रवासाचे तिकिट दाखवून त्या वेटिंग रुममध्ये प्रवाशांना थांबता येतं.