who invented #hashtags सध्या ‘हॅशटॅग’ हा शब्द अनेक ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतो. हॅशटॅग म्हणजे # या चिन्हाला जोडून लिहिलेले शब्द होय. एखाद्या विषयाला ठळक करण्यासाठी सुद्धा वापरला जातो. एखाद्या शब्दाला हॅशटॅग लावल्यामुळे त्याची एक लिंक तयार होते आणि आणि अशा शब्दांना जर आपण क्लिक केलं तर तो शब्द जिथंजिथं इंटरनेटवर उपलब्ध आहे तिथंतिथं त्या संदर्भातल्या पोस्ट्स, व्हिडिओज आपल्याला एका नजरेत दिसायला लागतात. खास करून फेसबूक, ट्विटर, टम्बलर, युट्युब अशा सोशल नेटवर्किंग साइटवर. तसं पाहिलं तर हॅशटॅगचा सर्वात आधी लोकप्रिय वापर ट्विटरच्या माध्यमातून झाला असला तरी आज मात्र वेगवेगळ्या सोशल नेटवर्किंग साइट्सवर हा शब्द सर्रास वापरताना आपल्याला दिसून येतो. ट्विटरचा विचार केला तर हॅशटॅगमुळं सध्या चालू ट्रेन्स आपल्याला कळायला मदत होते. हॅशटॅगमध्ये एक पेक्षाही जास्त शब्दही लावता येतात.

मात्र या हॅशटॅगची आपल्याला ओळख करुन कुणी दिली हे तुम्हाला माहितीये का? हॅशटॅग नक्की कुणी बनवले, हॅशटॅगची कल्पना कुणाला सुचली याबद्दल जाणून घेऊयात.

UP 10th Standard Topper Girl Prachi Nigam Facial Hair Controversy
अगं प्राची, दहावी बोर्डात पहिली आलीस पण चेहऱ्यावरचे केस काढता आले नाही? नक्की लाज कुणी सोडलीये?
devendra fadnavis uddhav thackeray
“अमित शाह तुला म्हणाले दोन मोठी…”, उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत सांगितलं शहांच्या मातोश्री भेटीवेळी काय घडलं?
ABP Sea voters Survey
Opinion Poll : महाराष्ट्रात महायुतीला मिळणार ४८ पैकी अवघ्या ‘इतक्या’ जागा? कुठल्या जागेवर कुणाची आघाडी?
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”

हेही वाचा >> छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर औरंगजेबानं पुण्याला दिलं होतं ‘हे’ नाव; जाणून घ्या इतिहास

हॅशटॅग या संकल्पनेच्या मागे कोण?

हॅशटॅग या संकल्पनेच्या मागे ख्रिस मेसिना हा व्यक्ती होता. ‘#हॅशटॅग’ हा शब्द पहिल्यांदा २००७ मध्ये अमेरिकन प्रॉडक्ट डिझायनर ख्रिस मेसिना यांनी वापरला होता. ट्विटमध्ये, चिन्हाचा वापर विषय किंवा गटांना टॅग करण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो. ऑगस्ट २००७ मध्ये त्यांनी ट्विटरवर “#barcamp” हा हॅशटॅग प्रथम प्रकाशित केला.

हॅशटॅग वापरण्यामागची गोष्ट

यामागची गोष्ट अशी की, मेसिनाला ऑनलाइन प्लॅटफॉर्मरुन हॅशटॅग वापरण्याची कल्पना आली ज्याने त्यांच्यासमोर पाउंड चिन्ह प्रदर्शित केले. त्याने ही संकल्पना ट्विटरवर सादर करण्याचा निर्णय घेतला, परंतु सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने त्याला चेतावणी दिली की ते चिन्ह कधीही लोकप्रिय होणार नाही. मात्र तरीही तो प्रयत्न करत राहिला. त्याऐवजी, त्याने मित्रांना हॅशटॅग वापरण्यास प्रोत्साहित करून सुरुवात केली. त्याचा एक मित्र ऑक्टोबर २००७ मध्ये सॅन दिएगो येथे लागलेल्या वणव्याबद्दल ट्विट करत होता. ख्रिसने त्याला हॅश वापरून ट्विट करण्यास सांगितले.त्यानंतर इत युजर्सनेही पटकन समान हॅशटॅग वापरण्यास सुरुवात केली.

हेही वाचा >> बफेलो सोल्जर्स! ‘या’ ठिकाणी पोलीस चक्क रेड्यावर बसून घालतात गस्त!

२०१० मध्ये जेव्हा इन्स्टाग्रामवर पहिल्यांदा हॅशटॅगचे चिन्ह दिसले तेव्हा वापरकर्त्यांनी छायाचित्रांमध्ये हॅशटॅग जोडण्यास सुरुवात केली. तर २०१३ मध्ये फेसबूकवरही त्याचा वापर सुरु झाला. अशाप्रकारे हॅशटॅग ही एक भन्नाट कल्पना असूनही, मेसिनाला या संकल्पनेतून कधीही आर्थिक फायदा झाला नाही.