Mercedes Benz या ब्रांडला कुठल्याही नव्या ओळखीची गरज नाही इतका हा ब्रांड जगप्रसिद्ध झाला आहे. पण ही खास कार आणि तिचं हे खास नाव कसं पडलं हे तुम्हाला माहीत आहे का? यासंदर्भात Mercedes Benz चे सीईओ स्टेन ओला कॅलिनस यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यांनी कंपनीला मर्सिडीझ हे नाव कसं मिळालं या कारला ते नाव कसं पडलं ते सांगितलं आहे. काय सांगितलं कॅलिनस यांनी? कॅलिनस यांनी सांगितलं की कंपनीची स्थापना १८८६ मध्ये झाली. त्यावेळी तिचे संस्थापक होते गॉटलिब डेमलर. त्यामुळे कंपनीचे नावही डेमलर यांच्या नावावरुनच होते. यानंतर सुमारे १५ वर्षांनी ऑस्ट्रेयन व्यावसायिक एमिल जेलनिक यांनी डेमलर यांनी रेसिंग कार माझ्यासाठी तयार करशील का अशी विचारणा केली. डेमलर आणि मेबॅक या दोघांनी मिळून जेलनिक यांना तशी कार तयार करुन दिली. मेबॅक हे कंपनीच चीफ इंजिनिअर होते. त्यांनी त्या कारचं इंजिन खूपच बळकट बनवलं. जेलनिक ही शर्यत जिंकले. त्यानंतर त्यांनी विनंती केली की माझ्या मुलीचं नाव तुमच्या कंपनीला द्याल का? ती विनंती डेमलर यांनी मान्य केली आणि कंपनीचं नाव झालं मर्सिडीझ (Mercedes Benz). कॅलिनस यांचा हा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. जेलनिक यांच्या दोन इच्छा कंपनीने पूर्ण केल्या डेमलर आणि विल्यम मेबॅक यांनी जेलनिक यांच्या दोन इच्छा पूर्ण केल्या. त्यातली पहिली इच्छा होती खास डिझाईनची कार तयार करुन देण्याची तर दुसरी इच्छा होती कंपनीला त्यांच्या मुलीचं नाव देण्याची. त्यांच्या मुलीच्या नावावरुन म्हणजेच मर्सिडीझ या नावावरुन ही कंपनी गेल्या १०० हून अधिक वर्षे ओळखली जाते आहे. डेमलर यांना हे नाव खूप आवडलं होतं. त्यामुळे त्यांनी ते कंपनीशी जोडलं. मर्सिडीझ बेंझ या कारला हे खास नाव कसं मिळालं? (फोटो-TIEPL) मर्सिडीझच्या वेबसाईटवर काय म्हटलं आहे? मर्सिडीझ बेंझच्या ( Mercedes Benz ) अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार २३ जून १९०२ या दिवशी मर्सिडीझ (Mercedes Benz) या नावाची नोंदणी करण्यात आली. त्यानंतर जेलनिकही या व्यवसायात उतरलो होते. त्यावेळी जेलनिक यांनी असंही म्हटलं होतं की कदाचित असं पहिल्यांदा होतं आहे की एखाद्या कारला वडिलांनी मुलीचं नाव दिलं आहे. हे पण वाचा- मर्सिडीझ मेड इन इंडिया पहिली इलेक्ट्रिक कार लाँच; जाणून घ्या किंमतीपासून फीचर्सपर्यंत बरचं काही… ३६ कार खरेदी करणारे एमिल जेलनिक एमिल जेलनिक यांना कार्सचा शौक होता. त्यांच्याबाबत असंही सांगितलं जातं की त्यांनी डेमलर कंपनीच्या ३६ कार खरेदी केल्या होत्या. डेमलर यांनी जेव्हा कार तयार करण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांनी विविध प्रयोगही केले होते. त्यांनी एक असं इंजिनही बनवून पाहिलं होतं जे मोटरसायकलला जोडता येईलल. त्यानंतर कालांतराने लक्झरी कार बनवणारी डेमलर ही कंपनी अस्तित्वात आली आणि मग या कंपनीतल्या खास कारचं नाव मर्सिडीझ बेंझ झालं. पहिल्या महायुद्धानंतर मर्सिडीझ कार जास्त चर्चेत आली. १९२६ मध्ये सात हजार मर्सिडीझ विकल्या गेल्या होत्या. त्यानंतर सुरु झालेल्या त्यांच्या यशाचा आलेख उंचावतच राहिला.