scorecardresearch

एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्या पगाराचा आकडा ऐकून व्हाल थक्क; आमदारांना तर महिन्याला…

Maharashtra Chief Minister Salary: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व निवडून दिलेले आमदार यांना किती पगार मिळतो हे तुम्हाला माहितेय का? राज्य सरकारच्या माहितीनुसार आज लोकप्रतिनिधींचे पगार किती हे जाणून घेऊया..

Monthly Salary of CM Eknath Shinde Devendra Fadnavis Income Of Maharashtra MLA of Shivsena Congress BJP NCP
एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्या पगाराचा आकडा ऐकून व्हाल थक्क (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Maharashtra Chief Minister Salary: महाराष्ट्र राज्य विधी मंडळ अधिवेशनात नुकतेच महाराष्ट्रासाठीचे बजेट सादर करण्यात आले. यात शेतकरी, महिला, कर्मचारी वर्ग यासह प्रत्येकासाठी तरतूद करण्यात आल्याचे शिंदे सरकारकडून सांगण्यात आले आहे. विरोधकांनी हा तुटीचा अर्थसंकल्प केवळ गाजर हलवा असल्याचे सुद्धा म्हंटले आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांना शेतमालासाठी कमी पैसे देण्याच्या वादावरून शेतकरी संघटना विधानभवनावर मोर्चाचे काढण्याच्या सुद्धा तयारीत आहेत. महाराष्ट्रातील विविध गटांच्या आर्थिक स्थितीविषयी बोलताना राज्याचे प्रमुख म्हणजेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व निवडून दिलेले आमदार यांना किती पगार मिळतो हे तुम्हाला माहितेय का? राज्य सरकारच्या पोर्टल्सवर उपलब्ध माहितीनुसार आज लोकप्रतिनिधींचे पगार किती हे जाणून घेऊया..

एकनाथ शिंदे यांचा महिन्याचा पगार (Maharashtra CM Eknath Shinde Salary)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पगार सुमारे तीन लाखांच्या घरात आहे. यासह मोफत निवास सुविधा आणि वैद्यकीय सेवा, प्रवास भत्ता, दूरध्वनी भत्ता अशा विविध सुविधा आणि भत्ते सुद्धा दिले जातात. याशिवाय त्यांना आमदार म्हणून एका महिन्याचे वेतनही दिले जाते

देवेंद्र फडणवीस यांचा पगार (Maharashtra DCM Devendra Fadnavis Salary)

दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही पगार साधारण ३ लाखापर्यंत असून वर उल्लेख केल्याप्रमाणे मोफत निवास सुविधा आणि वैद्यकीय सेवा, प्रवास भत्ता, दूरध्वनी भत्ता आणि सुविधा उपमुख्यमंत्र्यांना दिल्या जातात.

हे ही वाचा<< मुंबई महानगरपालिकेत ६०० हुन अधिक पदांसाठी बंपर भरती; निवडीचे निकष, पगार व अर्जाची पद्धत जाणून घ्या

आमदारांचा पगार (MLA Salary)

याशिवाय सर्व पक्षांच्या निवडून आलेल्या आमदारांना एका महिन्याचा मूळ पगार साधारण १ लाख ८० हजार इतका आहे. तर याव्यतिरिक्त महागाई भत्ता, दूरध्वनी आणि टपाल यासाठी भत्त्याची तरतूद आहे, असं मिळून हा आकडा २ लाख ३० हजारांच्या घरात जातो. तसेच माजी आमदारांना ५० हजार पेन्शन म्हणून देण्याची सुद्धा तरतूद आहे.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व FYI ( Do-you-know ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 13-03-2023 at 13:32 IST