जगाच्या कानाकोपऱ्यात तुम्हाला विविध प्रकारचे प्राणी, पक्षी आढळतात. तर प्रत्येक वंश, जात, धर्माचे लोक दिसतात, प्रत्येक देशातील लोकांची शारीरिक रचना काहीप्रमाणात सारखी असली तरी चेहरे वेगळे असतात. काही देशात लोकांची उंची फार कमी असते तर काही देशांमधील लोक फार उंच असतात. ज्यावरून हे कोणत्या देशातील असू शकतात याचा अंदाज बांधता येतो. मग तो चीन असो वा जपान किंवा भारत असो वा अमेरिका. पण तुम्हाला माहित आहे का जगात माणसांची एक जमात आहे जी एका विचित्र परिस्थितीतून जात आहे.

माणसाच्या एका पायाला साधारणपणे पाच बोट असतात. पण झिम्बाब्वेच्या उत्तर भागात असलेल्या कायम्बा प्रदेशात राहणाऱ्या एका जमातीच्या लोकांना पायाला फक्त दोन बोटे आहेत. ही बोट इतकी मोठी आहेत की, जी पाहून तुम्ही देखील आश्चर्यचकित व्हाल. आपण दुर्मिळ अनुवांशिक स्थितीसाठी प्रसिद्ध असलेल्या वडोमा जमातीबद्दल बोलत आहोत. या जमातातील लोकांचे संपूर्ण शरीर मानवासारखे आहे पण पायांचा पोत शहामृगासारखा आहे. पायाची बोटं इतकी मोठी आहेत की ते लोक सामान्य माणसांसारखे बूट घालू शकत नाहीत किंवा नीट चालू शकत नाहीत.

chaturang article, maintain relationship, good relations, avoid assuming, assuming in relationship, assume, stay away from toxic people, spreading bad thoughts in relationship, husband wife
जिंकावे नि जगावेही : नात्यांमधला नीरक्षीरविवेक!
Vipreet Rajyog
विपरीत राजयोगामुळे या राशींना मिळेल छप्परफाड पैसा! उघडेल नशिबाचे दार
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
नात्यातील ताण्याबाण्यांची गंमत

या जमातीच्या लोकांचे पाय शहामृगासारखे का आहेत?

या जमातीच्या लोकांच्या पायांची बोट इतकी वेगळी का आहेत असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. तर मागचे कारण असे आहे की, या जमातीतील बहुतेक लोक एका अनुवांशिक विकाराने ग्रस्त आहेत. ज्याला इक्ट्रोडॅक्टिली’ किंवा ‘ऑस्ट्रिच फूट सिंड्रोम’ म्हणतात. दुर्मिळ रोगानुसार, इक्ट्रोडॅक्टिलीला स्प्लिट हँड/फूट विकृती (SHFM) असेही म्हणतात. हा आजार पायाच्या बोटांवर होतो. काही वेळा पायासोबतच हाताच्या बोटांनाही त्रास होतो.

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, या जमातीच्या लोकांची जन्माच्या वेळी एक किंवा अधिक बोटे गायब आहेत. असे मानले जाते की, वडोमा जमातीमध्ये जन्मलेल्या प्रत्येक चार मुलांपैकी एकाला या आजाराचा सामना करावा लागत आहे. बहुतेक लोकांची तीन मधली बोटे गहाळ असतात आणि त्याऐवजी फक्त दोन बोटे असतात. जी आतून किंवा बाहेर वळलेली असतात. या लोकांना त्यांच्या जमातीबाहेर लग्न करण्यास बंदी आहे, जणेकरून हा रोग इतर जमातींच्या लोकांमध्ये पसरणार नाही.

इतर जमातीतील व्यक्तीसह लग्न करण्यास बंदी

या लोकांना जमातीच्या बाहेर लग्न करण्यास बंदी असलेले कायदे असूनही, ही परिस्थिती इतर जमातींमध्ये देखील आहे, ज्यात कलहारी वाळवंटातील तळोंडा किंवा तालौते कलंगा यांचा समावेश आहे. असे मानले जाते की, हे लोक डोमा जमातीशी वंशज आहेत. रिपोर्ट्सनुसार, हा समुदाय त्याच्या स्थितीला अपंगत्व मानत नाही.

या सगळ्याकडे ते आपली ताकद म्हणून पाहतात आणि ही स्थिती ते साजरी करतात. या जमातीचा असा विश्वास आहे की, त्यांच्या या गोष्टीमुळे ते आज झाडावर वेगाने चढू शकतात. या जमातीचे लोक आपल्या उदरनिर्वाहासाठी शिकार, मासेमारी आणि मध गोळा करणे झाडांची फळे तोडणे यांसारखी काम करतात.