Personal Student Loans Benefits, Eligibility, Interest Rates : सध्याच्या घडीला स्पर्धेचं वातावरण मोठ्या प्रमाणावर आहे असं दिसून येतं. या सगळ्या स्थितीत शिक्षण घेण्यासाठी आणि त्यातून आपलं करिअर करण्यासाठी विद्यार्थी विविध पर्याय अवलंबत असल्याचं दिसून येतं. यातला एक प्रकार आहे ते म्हणजे शिक्षणासाठी मिळणारं कर्ज. विद्यार्थ्यांना जे कर्ज दिलं जातं त्यात पर्सनल स्टुडंट लोन हा महत्त्वाचा प्रकार आहे. तसंच लोनचा हा प्रकार प्रचलितही आहे. पर्सनल स्टुडंट लोन म्हणजे उच्च शिक्षणासाठी घेण्यात आलेलं कर्ज. आपण जाणून घेऊ याबाबत.

पर्सनल स्टुडंट लोन शिक्षणाशी संबंधित आहे

पर्सनल स्टुडंट लोन हे अर्जदारांच्या शिक्षणाशी संबंधित असते. शैक्षणिक कर्ज हे ट्यूशन किंवा शिक्षणासाठी असतं. तर पर्सनल स्टुडंट लोनचा उपयोग हा घराचे भाडे देणं, लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर खरेदी करणं यासाठीही केला जातो. या लोनसाठी गॅरेंटरची गरज भासते. एखाद्या अर्जदाराने कर्ज चुकवलं नाही तर त्यासाठी गॅरेंटरला जबाबदार धरलं जाऊ शकतं.

पर्सनल स्टुडंट लोनसाठी अर्ज कसा करायचा?

उत्पन्नाचा दाखला, ओळखपत्रं यांची आवश्यकता असते. ज्या बँकेकडे किंवा आर्थिक पुरवठा करणाऱ्या संस्थेचा अर्ज भरुन त्याला आवश्यक कागदपत्रं जोडावी लागतात. एका गॅरेंटरची आवश्यकताही भासते. अर्जाचे सगळे तपशील तपासल्यानंतर लोन अप्रुव्ह झाल्यास अर्जदाराला हे कर्ज मिळतं.

अर्जदारांनी काय काळजी घ्यावी?

ज्या बँकेतून तुम्ही पर्सनल स्टुडंट लोन घेत आहात त्या बँकेबाबत संपूर्ण माहिती आधी करुन घ्या.

लोन संदर्भातले जे नियम आणि अटी आहेत ते शांतपणे वाचा.

तुमची जी गरज आहे त्यानुसार लोनची अमाऊंट लिहा. कारण हे कर्ज तुम्हाला परत करायचं असतं. त्यामुळे तेवढंच कर्ज घ्या जेवढं तुम्ही फेडू शकणार आहात.

बँकेचे व्याजाचे दर काय आहेत? हे माहिती करुन घ्या. त्याबाबत नीट चौकशी करुन घ्या त्यानंतर कर्ज घ्या.

पर्सनल स्टुडंट लोन घेण्यासाठीची पात्रता काय?

अर्जदार १८ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाचा विद्यार्थी असला पाहिजे.

अर्जदाराने त्याच्या आई वडील किंवा पालकांपैकी कुणाला तरी गॅरेंटर म्हणून ठेवलं पाहिजे.

अर्जदाराने आई किंवा वडील यांच्या उत्पन्नाचा दाखला आणि आवश्यक प्रमाणपत्रं द्यावीत.

अर्जदाराच्या आई वडिलांचं वार्षिक उत्पन्न स्थिर असलं पाहिजे. तसंच ज्या अर्जदाराला कर्ज हवं आहे त्याचा प्रवेश निश्चित झाला पाहिजे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गॅरेंटर म्हणून अर्जदाराच्या आई-वडील किंवा पालकांना रहावं लागेल त्यानंतरच कर्ज मिळू शकणार आहे.