मोबाईल हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. आजच्या काळामध्ये मोबाईल शिवाय जगणे हे कठीणच झाले आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्या हातामध्ये मोबाइल पाहायला मिळतो.दिसायला जरी लहान असला तरी एवढ्याश्या मोबाईल मध्ये संपूर्ण जग सामावलेले आहे. त्यामुळे मोबाईल चे महत्व हे खरंच अनन्यसाधारण आहे. पूर्वी जसे म्हंटले जायचे अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा आहेत,परंतु आता त्यात मोबाईल देखील माणसाची मूलभूत गरज बनला आहे. अगदी कमी कालावधीत ह्या इलेक्ट्रॉनिक उपकरणाने माणसाच्या आयुष्यातील महत्वाचे स्थान काबीज केले आहे.

फोनसोबत आणखी एक गोष्ट महत्वाची असते, ते म्हणजे फोनचा चार्जर. चार्जरशिवाय फोनचं काही अस्तित्व नाही, कारण जर फोनची बॅटरी संपली तर तो फोन काहीच कामाचा नाही. पण याच चार्जरबद्दल एक गोष्ट फार कमी लोक विचार करतात. ते म्हणजे, चार्जर सॉकेटला लावून ठेवणे. असे अनेक जण आहेत, जे आपला चार्जर इलेक्ट्रिक सॉकेटला लावून ठेवतात आणि त्यालाच आपला फोन लावतात आणि बटण बंद करुन आपला फोन काढतात. पण चार्जर मात्र कधीच काढत नाहीत. पण कधी विचार केलाय का की असे करणे किती योग्य आहे? असे केल्याने चार्जर वीज वापरतो का? किंवा याचा चार्जरच्या आयुष्यावर काही परिणाम होतो का? चला तर मग याबद्दल जाणून घेऊ.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सॉकेटमधील चार्जर खरंच वीज वापरतो का?

आपल्यापैकी 99% लोकं फक्त Charger मधून फोन बाहेर काढतात. मात्र चार्जर आहे तसाच सॉकेटमध्ये लावून ठेवतात. याशिवाय अशी किती लोकं असतील जे आधी चार्जरमधून फोन काढतात आणि मग सॉकेटममधून चार्जर काढून ठेवतात. मात्र यामुळे वीज खर्च होत नाही तर हळूहळू चार्जरचेच आयुष्य कमी होते. कारण आपला फोन वारंवार चार्ज केल्याने त्याच्या बॅटरी लाईफवरही परिणाम होतो. यामुळेच आपल्या फोनच्या बॅटरीसाठी 40-80 नियम फॉलो करायला हवा. ऑप्टिमाइझ केलेल्या बॅटरी लाइफसाठी आपला फोन कधीही 40 टक्क्यांपेक्षा कमी किंवा 80 टक्क्यांपेक्षा जास्त चार्ज नसावा. अनेकदा लोकं वेगवेगळ्या चार्जरने फोन चार्ज करतात. मात्र कोणत्याही बॅटरीसाठी हे योग्य ठरणार नाही. यामुळे नेहमीच आपल्या ओरिजनल चार्जरनेच आपला फोन चार्ज करण्याचा सल्ला तज्ञांकडून दिला जातो.