PM Modi US Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याकडून भेटवस्तू स्वीकारल्या. परंतु, पंतप्रधान मोदी यांनीही अमेरिकेच्या फर्स्ट लेडी जिल बायडेन आणि जो बायडेन यांना भारतातील महाराष्ट्रासहित १० राज्यांतील महत्त्वाच्या काही खास वस्तू भेट स्वरूपात दिल्या. त्यात मोदींनी जिल बायडेन यांना एक मौल्यवान हिराही भेट म्हणून दिला आहे.

भारताने दिलेला हा हिरवा हिरा मौल्यवान आहे. पण, हा हिरा इतका खास का आहे आणि तो सामान्य हिऱ्यापेक्षा किती वेगळा आहे हे जाणून घेऊ …

पंतप्रधान मोदींनी कोणता हिरा दिला भेट?

पंतप्रधान मोदींनी अमेरिकेच्या फर्स्ट लेडी जिल बायडेन यांना ७.५ कॅरेटचा हिरा भेट दिला आहे. प्रगत तंत्रज्ञानाने बनवलेला हा खास हिरा प्रतिकॅरेट फक्त ०.०२८ ग्रॅम कार्बन उत्सर्जित करतो. हा हिरा पृथ्वीवरून निघणाऱ्या रासायनिक आणि ऑप्टिकल घटकांचे गुण दर्शवतो; जो पर्यावरणास अनुकूलही आहे. कारण- या हिऱ्याच्या निर्मितीसाठी सौर व पवनऊर्जा यांसारख्या संसाधनांचा वापर करण्यात आला आहे.

विश्लेषण: प्रयोगशाळेत कृत्रीम हिरे कसे बनवले जातात? अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी यासाठी अनुदान का दिले?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हिरवा हिरा नेमका आहे कसा?

हिरवा हिरा हा सामान्य हिऱ्यापेक्षा कसा वेगळा आहे हे जाणून घेऊ. हा एक अत्यंत दुर्मिळ हिरा असून तो रेडिओॲक्टिव्ह आहे. ॲटोमिक रेडिएशनच्या जास्त संपर्कात आल्यानंतर तो तयार होतो आणि अनेक वर्षे त्याचा प्रतिकार करतो. जरी तो रेडिओॲक्टिव्हच्या प्रभावाखाली राहत असला तरीही तो खऱ्या हिऱ्यासारखा अत्यंत दुर्मिळ आहे. हिरव्या हिऱ्यामध्ये अनेक प्रकारचे हिरे येतात, जसे की, लाइट ग्रीन, फॅन्सी ग्रीन, फॅन्सी डिप इ. हा हिरवा हिरा इतर रंगीत हिऱ्यांपेक्षा महाग आहे.