महागाईच्या काळात पीपीएफ हा सुरक्षित आणि सोयीस्कर गुंतवणुकीचा पर्याय मानला जातो. जर तुम्ही PPF खात्यात गुंतवणूक केली असेल आणि तुमचे खाते काही कारणास्तव बंद झाले असेल किंवा निष्क्रिय झाले असेल, तर घाबरू नका. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. कारण तुमची गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित आहे आणि तुम्ही तुमचे खाते पुन्हा सुरू करू शकता. कोणतीही व्यक्ती फक्त एकच PPF खाते उघडू शकते. पीपीएफमध्ये गुंतवणूक कर सवलतीच्या दृष्टीनेही खूप महत्त्वाची आहे. यामध्ये गुंतवणुकीवर कर कपातीचा लाभ मिळतो. याशिवाय मॅच्युरिटी रक्कम आणि व्याजाचे उत्पन्नही करमुक्त आहे. आता आम्‍ही तुम्‍हाला तुमचे बंद केलेले PPF खाते कसे पुन्हा सुरू करायचे ते सांगणार आहोत.

पहिल्यांदा पीपीएफ खात्यात गुंतवणूक कशी करावी हे जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला पीपीएफमध्ये गुंतवणूक करायची असेल, तर तुम्ही जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा बँकेत जाऊन पीपीएफ खाते उघडू शकता. यासाठी तुम्हाला एक फॉर्म भरावा लागेल. यामध्ये तुम्हाला एका वर्षात किमान 500 रुपये गुंतवावे लागतील आणि जर तुम्ही किमान गुंतवणुकीची अट पूर्ण केली नाही तर तुमचे पीपीएफ खाते निष्क्रिय होईल.

PPF खाते का बंद होते?

जर पीपीएफ खातेदाराने एखाद्या आर्थिक वर्षात खात्यात किमान रक्कम टाकली नाही किंवा ती ठेवायला विसरला तर हे खाते बंद होते. PPF मध्ये 15 वर्षांनी मॅच्युरिटी कालावधी संपल्यानंतरच ग्राहकाला त्याची रक्कम व्याजासह मिळते. हे व्याज दरवर्षी शिल्लक रकमेत जोडले जाते. हे बंद पीपीएफ खात्यावरही लागू आहे. सरकार वेळोवेळी व्याजदर निश्चित करीत असते. मॅच्युरिटीच्या तारखेपूर्वी बंद केलेले पीपीएफ खाते कायमचे बंद केले जाऊ शकत नाही. जर एखाद्याला ते पुन्हा सुरू करायचे असेल, तर हे काम मुदतपूर्तीच्या तारखेपूर्वी कधीही केले जाऊ शकते. पीपीएफ पासबुकमध्ये मॅच्युरिटीची तारीख नमूद केलेली असते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अशा पद्धतीनं करा पीपीएफ खाते पुन्हा सुरू

बंद केलेले पीपीएफ खाते पुन्हा सुरू करण्यासाठी तुम्हाला ते उघडलेले बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये एक लेखी अर्ज द्यावा लागेल. मॅच्युरिटी कालावधीदरम्यान बंद केलेले पीपीएफ खाते पुन्हा सुरू केले जाऊ शकते. यासाठी 500 रुपयांसोबत वार्षिक 50 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. हे शुल्क वार्षिक आधारावर आकारले जाईल. परंतु बंद खात्यातील शिल्लक रक्कम मॅच्युरिटीपूर्वी खातेदाराकडून खाते पुन्हा सुरू केल्यानंतरही काढता येत नाही.