भारत हा एक अतिशय सुंदर देश आहे, भारतातील अनेक सुंदर ठिकाणी तुम्ही कधीही अगदी आरामात प्रवास करु शकता. परंतु तुम्ही भारताबाहेर प्रवास करण्याचा विचार करत असाल तर असे काही देश आहेत जिथे तुम्ही फक्त पासपोर्ट घेऊन जाऊ शकता, तुम्हाला प्रवासासाठी व्हिसाची गरज लागत नाही. विशेष म्हणजे त्या देशांमध्ये तुम्ही ओळखीच्या लोकांकडे राहून अगदी कमी खर्चात सुट्ट्यांचा आनंद लुटू शकता. त्यामुळे आपण जगातील ५ सुंदर देशांबद्दल जाणून घेणार आहोत जिथे तुम्ही व्हिसाशिवाय प्रवास करु शकता, फक्त पासपोर्टवर तुम्ही या देशांत फिरू शकता. पाहूया…

व्हिसाशिवाय फिरु शकता ‘हे’ ५ सुंदर देश

१) भूतान

भूतान हा भारताच्या शेजारील एक सुंदर देश आहे. तुम्ही विमान किंवा रस्त्ये मार्गाने येथे पोहोचू शकता. हिमालय पर्वत रांगेत वसलेला हा देश बौद्ध धर्मासाठी ओळखला जातो. तुम्ही तिथे ट्रेकिंगचा थरारक अनुभव घेऊ शकता आणि नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेऊ शकता. याठिकाणी तुम्ही टायगर नेस्ट, डोचुला पास, हा व्हॅली आणि पुनाखा जोंग यासारख्या ठिकाणांना भेट देऊ शकता. याशिवाय तुम्ही अनेक प्रकारच्या बौद्ध मठांनाही भेट देऊ शकता.

pune bhel seller old couple video viral
Pune : पुण्यासारखी माणुसकी कुठे सापडेल? भेळ विकणाऱ्या वृद्ध जोडप्याचा VIDEO होतोय व्हायरल
Tigress chilling in a jungle stream on a hot summer
Viral Video : हाय गर्मी! उन्हाचा तडाखा सहन झाला नाही म्हणून वाघीन अशा ठिकाणी जाऊन बसली की तुम्ही…
robbing shopkeepers
दुकानदारांना लुटण्याचा हा नवीन प्रकार तुम्ही पाहिला आहे का? व्हिडीओ पाहा अन् सतर्क व्हा
Addicted to junk food and can’t seem to stop Here’s how to overcome it
तुम्हाला जंक फूड खाण्याचे व्यसन आहे का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या कशी सोडावी ही वाईट सवय

२) मॉरिशस

मॉरिशसमध्ये लोक वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेण्यासाठी जातात. या देशात तुम्हाला यूपी बिहारसारखे अनेक भारतीय लोक भेटतील, याठिकाणी भोजपुरी बोलणारेही अनेक लोक आहेत. समुद्र किनाऱ्यालगत उंच टेकड्यांना आदळणाऱ्या समुद्राच्या अजस्त्र लाट पाहण्यासाठी अनेक पर्यटक याठिकाणी येतात. त्यामुळे सुंदर समुद्र किनाऱ्यांना भेट देत आनंद घेण्यासाठी तुम्ही येथे जाऊ शकता.

३) इंडोनेशिया

जर तुमच्याकडे पासपोर्ट असेल तर तुम्ही टुरिस्ट व्हिसाशिवाय इंडोनेशियाला जाऊ शकता. इंडोनेशियातील बाली हे ठिकाण पर्यटकांचे सर्वात आवडतं आहे. याशिवाय येथील निळेशार समुद्र, मरीन लाइफ आणि ज्वालामुखीच्या पर्वतांचा आनंद घेऊ शकता. तुम्ही पापुआ बेट आणि जकार्तालाही भेट देऊ शकता.

४) फिजी

जर तुम्ही कोणत्याही आइलँडला भेट देण्याचा विचार करत असाल तर तुम्ही फिजीला जाऊ शकता. इथे तुम्हाला खूप सुंदर गावं पाहायला मिळतील. विशेष म्हणजे अनेक हिंदी भाषिक लोकही भेटतील. फिजीमध्ये तुम्ही सुवा गार्डन ऑफ स्लीपिंग जायंट, फॉरेस्ट पार्क आणि फिजी म्युझियमला ​​भेट देऊ शकता. तुम्ही फक्त १ लाखात ३ दिवस आरामत फिरु शकता.

५) सेशेल्स

जर तुम्हाला आफ्रिका आणि बेटांवर प्रवास करण्याची आणि राहण्याची इच्छा असेल तर तुम्ही सेशेल्सला जाऊ शकता. येथे तुम्ही माहे आणि प्रस्लिन बेटांसारख्या अनेक सुंदर बेटांवर तुमचा सुंदर वेळ घालवू शकता. त्यामुळे जर तुम्हाला व्हिसाशिवाय भारताबाहेर फिरायचे असेल तर तुम्ही या ठिकाणांना नक्की भेट देऊ शकता.