आजकालचे इलेक्ट्रिक दिवे जेमतेम काही महिने, फार-फार तर वर्षभर व्यवस्थित टिकतात. मात्र, अमेरिकेतील कॅलिफोर्निया शहरात एक असा दिवा आहे जो तब्बल शंभर वर्षांपासून अखंड चालू आहे. हा कारबन फिलॅमेंट दिवा १९०१ सालापासून सुरू असून याचे नाव सेंटेनिअल ब्लब [Centennial Bulb] असे देण्यात आले आहे. हा खास दिवा अमेरिकेतील कॅलिफोर्निया शहरामधील लिव्हमोर अग्निशमन विभाग क्रमांक ६ येथे लावण्यात आलेला आहे. इतकेच नव्हे, तर याची नोंद गिनीज बुकातही झालेली आहे. त्यांनी या दिव्याला, ” लाँगेस्ट बर्निंग लाईट ब्लब” म्हणजेच सर्वात जास्त काळासाठी सुरू असलेला दिवा असे नाव दिले आहे. शेलबी इलेक्ट्रिक कंपनीने १८९९ ते १९०० या काळात ओहायोमध्ये हाताने बनवलेला हा दिवा आहे आणि १९०१ साली लिव्हमोर पॉवर आणि पाणी कंपनीचे मालक डेनिस बेर्नल यांनी हा दिवा लिव्हमोर अग्निशमन दलाला दिला आहे, अशी माहिती न्यूज १८ डॉट कॉमच्या एका लेखातून समजते.

“अ मिलियन आवर्स ऑफ सर्व्हिस, द सेन्टेनिअल लाइट बल्ब फॅक्ट्स अँड हिस्ट्री” या पुस्तकाचे लेखक आणि सेवानिवृत्त उप अग्निशमन प्रमुख टॉम ब्रामेल यांनी हा दिवा अग्निशमन दलासाठी कसा उपयुक्त ठरला, याबद्दल मर्क्युरी न्यूजला माहिती दिली आहे. त्यानुसार, १९९० च्या दशकातही विजेचे दिवे हे फारसे वापरात नव्हते. “त्या काळात अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना रॉकेलचे कंदील लावावे लागत असत, मात्र हा दिवा आल्यानंतर त्यांच्यासाठी काम करणे फारच सोयीचे झाले. त्यांना आता रात्रीदेखील व्यवस्थित काम करता येते”, असे टॉम सांगतात.

11th class, seats vacant,
अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत प्रचंड प्रमाणात जागा रिक्त राहिल्याचे उघडकीस, झाले काय?
Accused who absconded after killing arrested after 34 years
हत्या करून फरार झालेल्या आरोपीला ३४ वर्षांनी अटक; गुन्हे शाखा १ ची कारवाई
pune city, sales of electric vehicles, last year, Gudi Padwa festival
पुणे : कुणी इलेक्ट्रिक वाहन घेता का? गेल्या वर्षीपेक्षा पाडव्यानिमित्त विक्रीत तब्बल ८५ टक्क्यांची घट
curiosity about indians performance in paris olympic
अन्वयार्थ : असले ‘अव्वल स्थान’ काय कामाचे?

हेही वाचा : हत्तीची स्मशानभूमी? खरंच हा बुद्धिमान प्राणी शेवटचा श्वास घेण्यासाठी विशिष्ट ठिकाणी जातो? जाणून घ्या…

हा दिवा सर्वप्रथम एल स्ट्रीटवरील अग्निशमन विभागात लावण्यात आला असून, तो १९७६ सालापर्यंत अखंड चालू होता. परंतु, एल स्ट्रीट ते सध्याच्या विभाग ६ मध्ये हा दिवा आणेपर्यंत २२ मिनिटांसाठी तो बंद करण्यात आला होता. “हा दिवा एका अग्निशमन केंद्रातून दुसऱ्या केंद्राकडे हलविण्यात आला, केवळ तेव्हा एकदाच तो बंद करण्यात आला आहे”, असे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने म्हटले आहे.

ज्यांना हा दिवा बघण्याची उत्सुकता आहे ते लिव्हमोर अग्निशमन विभाग क्रमांक ६ ला भेट देऊ शकतात आणि तिथे सुरू असलेला हा दिवा बघू शकतात. सध्या हा दिवा त्याच्या ६० वॅट या पूर्ण क्षमतेवर जळत नसून, ४ वॅटवर जळत आहे. हा चालू दिवा बघण्याची सर्वोत्तम वेळ ही सकाळी १० ते साडे अकरा आणि दुपारी ३ ते ५ ही आहे, अशी माहिती न्यूज १८ डॉट कॉमच्या लेखावरून समजते.

२००१ साली असलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ‘जॉर्ज बुश’ यांनी या दिव्याच्या शंभराव्या वर्धापन दिनानिमित्त लिव्हमोर अग्निशमन दलाला एक पत्र लिहिले होते, ज्यामध्ये या दिव्याला, ‘अमेरिकेन शोधाचे आणि सर्व समुदायाच्या अभिमानाचे प्रतीक’ म्हटले आहे.

हेही वाचा : या पठ्ठ्याने चक्क ‘एक लिटर’ टोमॅटो सॉस पिऊन बनवला ‘गिनीज रेकॉर्ड’! व्हायरल होणारा ‘हा’ व्हिडीओ पाहा

हा दिवा अजून पुढील शंभर वर्षांसाठी काम करत राहील असे टॉम यांना वाटते. “अर्थातच अशी वेळ येईल, जेव्हा हा दिवा बंद होईल. प्रत्येक गोष्ट ही कधी तरी नाश पावते आणि या दिव्याचेदेखील असे होईल. मात्र, तंत्रज्ञानामधील ही सर्वात अप्रतिम अशी कामगिरी आहे. हा दिवा अजूनही जेव्हापासून लावला होता तेव्हापासून अग्निशमन विभागामध्ये कर्मचाऱ्यांसाठी आठवड्याचे सात दिवस आणि दिवसातील चोवीस तास अविरत चालू असतो”, अशी माहिती टॉम ब्रामेल यांनी मर्क्युरी न्यूजला देताना सांगितली.