Vande Bharat Sleeper Trains Updates : वंदे भारत एक्स्प्रेस ही देशातील पहिली सेमी-हाय स्पीड ट्रेन यशस्वीपणे धावत आहे. यादरम्यान आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ती बातमी म्हणजे वंदे भारत ट्रेननंतर आता वंदे भारत स्लीपर ट्रेन लवकरच रुळांवर धावताना दिसणार आहे.

ही ट्रेन येत्या तीन महिन्यांत सुरू होण्याची शक्यता आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी बेंगळुरू येथील भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड (BEML) उत्पादन युनिटमध्ये वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या प्रोटोटाईपचे अनावरण केले आहे. यावेळी त्यांनी वंदे भारत एक्स्प्रेस चेअर कारनंतर रेल्वे विभाग वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या कामात गुंतला असल्याचे सांगितले. वंदे भारत स्लीपर ही स्वयंचलित ट्रेन आहे.

Vande Bharat sleeper trains Nagpur to pune
खरंच नागपुर ते पुणे वंदे भारत स्लीपर ट्रेन १५ सप्टेंबरपासून सुरू होणार? आलिशान ट्रेनचा Video होतोय व्हायरल
Shantanu Naidu ratan tata youngest friend
कोण आहे ३० वर्षांचा पुणेकर शांतनू नायडू? त्याची…
Nitin Gadkari
Nitin Gadkari : १९०० कोटींमध्ये रस्ता बांधून ८००० कोटी टोल का वसूल केला? नितीन गडकरींना थेट प्रश्न, हिशेब सांगत म्हणाले…
IPS Shivdeep Lande Resign
IPS Shivdeep Lande Resign : आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांचा तडकाफडकी राजीनामा; कारण काय?
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…”; शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत
vande bharat express
नागपूर : वंदे भारत एक्सप्रेस रद्द! रेल्वेचा निर्णय काय जाणून घ्या…
govinda fan styed at his home as maid
“मंत्र्याची मुलगी मोलकरीण म्हणून आमच्या घरात…”, बॉलीवूड अभिनेत्याच्या पत्नीचा खुलासा; म्हणाली, “तिचे वडील…”
Boy teasing bull to over noise near his ear then bull revenge from boy shocking video
“काय गरज होती का?” बैलाच्या कानाजवळ वाजवला ताशा अन् शेवटी…; VIDEO पाहून तुम्हीच सांगा हे कितपत योग्य

वंदे भारत स्लीपर ट्रेनची वैशिष्ट्य (Vande Bharat Train Sleeper)

या ट्रेनमध्ये एकूण १६ डबे असतील. त्यामध्ये थ्री टायर एसी, टू टायर एसी व फर्स्ट क्लास एसी असे तीन प्रकारचे डबे आहेत. सर्व डबे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असतील. त्यामुळे वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या डब्यामधून तुम्हाला खूप आरामदायी प्रवास करता येईल.

नवीन वंदे भारत स्लीपर ट्रेन ताशी १६० किलोमीटर वेगाने धावेल. १६ डब्यांची ही ट्रेन रात्रीच्या प्रवासासाठी योग्य आहे. ८०० किमी ते १२०० किमीपर्यंतच्या मार्गांवर ती धावेल.

या ट्रेनमध्ये ऑक्सिजनची पातळी चांगली आहे आणि त्यामुळे कोणत्याही संसर्गापासून संरक्षणही मिळू शकेल. वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये प्रवासी आरामात झोपून प्रवास करू शकतात.

Read More Vande Bharat Train News : वंदे भारत स्लीपर ट्रेनचा पहिला लूक, VIDEO आला समोर; सीटिंग चेअर, कॉरिडॉरसह संपूर्ण इंटिरियर पाहून व्हाल चकित

भाडे किती असेल? (Vande Bharat Sleeper Ticket Price)

वंदे भारत स्लीपरचे तिकीट भाडे राजधानी एक्स्प्रेससारखेच असेल. त्यामध्ये तुम्हाला जीएफआरपी पॅनेल, स्पेशल बर्थ, यूएसबी चार्जिंग रीडिंग लाईटसह सामान
ठेवण्यासाठी चांगली जागा मिळेल.

वंदे भारत स्लीपर ट्रेनचे आतील इंटेरिअरही आलिशान आहे. त्याशिवाय दिव्यांगांनाही या ट्रेनचा लाभ घेता यावा यासाठी त्यामध्ये विशेष स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याव्यतिरिक्त स्वयंचलित दरवाजाची सुविधाही उपलब्ध आहे.

या ट्रेनमध्ये वरील (अपर) आणि मधल्या (मिडल) शायिकेपर्यंत जाण्यासाठी जिना अधिक चांगला करण्यात येणार आहे. त्यामुळे ज्येष्ठ व्यक्तींनाही त्या शायिकेपर्यंत सहज जाता येणार आहे. (Vande Bharat sleeper trains update)

त्याशिवाय फर्स्ट क्लास एसी कोचमध्ये प्रवाशांना अंघोळीसाठी गरम पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या ट्रेनमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेचीही पूर्ण काळजी घेण्यात आली आहे. ट्रेनच्या सर्व कोचमध्ये सेन्सर बेस्ड दरवाजे बसविण्यात आले आहेत. प्रत्येक बर्थच्या बाजूला पॅड फीचर असणार आहे.

त्याशिवाय फायर सेफ्टी, लोको पायलट क्रूच्या सोईसाठी स्वतंत्र टॉयलेट, प्रवासी माहिती फलक आदी सुविधा उपलब्ध आहेत. विशेषत: या ट्रेनमध्ये विमानाप्रमाणे बायो-व्हॅक्युम टॉयलेट्स बसविण्यात येत आहेत. त्यामुळे दुर्गंधीचा त्रास होणार नाही. एकूणच वंदे भारत स्लीपर ट्रेनचा प्रवास खूप मजेशीर असणार आहे.