scorecardresearch

Premium

रस्त्याच्या मधोमध पांढर्‍या अन् पिवळ्या रेषा का आखल्या जातात? तुटक रेषांचा नेमका अर्थ काय? अनेकांना माहिती नाही ‘हे’ कारण

Road Lines: रस्त्यावर असलेल्या पांढऱ्या-पिवळ्या रेषांचा काय असतो अर्थ माहिती आहे का, जाणून घ्या…

Road Lines
रस्त्यावरील रेषांचा अर्थ काय? (Photo-Pixabay)

What are yellow and white lines on roads: देशाच्या कानाकोपऱ्याला जोडण्यात रस्त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. रस्त्यावरून चालतांना आपल्याला प्रामुख्याने पांढऱ्या पिवळ्या रंगाचे पट्टे दिसतात. या रेषा वेगवेगळ्या प्रकारात असतात, म्हणजेच सरळ सिंगल रेष, डबल रेष, तुटक रेष, पिवळी रेष, पांढरी रेष इत्यादी. मात्र, तुम्हाला या पट्टयांचा कधी प्रश्न पडलाय का, या रेषांचा नेमका अर्थ काय आणि त्याचं महत्व काय? मित्रांनो, तुम्हाला जर का या प्रश्नाचं उत्तर माहित नसेल तर रस्त्यावर चुकीच्या पध्दतीने सुसाट गाडी पळवू नका, नाहीतर पोलीस तुमच्यावर दंड ठोकल्याशिवाय राहणार नाही. यापासून स्वत:ला वाचवायचं असेल आणि स्वत:ला सुरक्षित ठेवायचं असेल तर ही माहिती फक्त तुमच्यासाठी आहे बरं का! चला मग समजून घेऊया सविस्तरपणे.

सरळ पांढऱ्या रेषेचा अर्थ काय?

रस्त्यावरील पूर्ण पांढऱ्या रेषेला इंग्रजीत ‘व्हाईट सॉलिड लाइन’ असे म्हणतात. ती रस्त्याच्या मध्यभागी असते. ही पांढरी ठोस रेषा सूचित करते की, रस्त्यावर कोणत्याही दिशेने वाहन चालवत असताना आपण यू टर्न घेऊ शकत नाही आणि ओव्हरटेक देखील करू शकत नाही. जर ती लाइन क्रॉस करताना एखाद्या ट्राफीक पोलिसांने तुम्हाला पकडलं तर ते तुमच्यावर दंड ठोठावू शकतात.

Old Malavani Aaji Writes Letter To Son After Ganpati Visit How Konkan Gets Lonely International Day Of Older Person Emotional
गणपतीला आलेला लेक, सून, नात मुंबईत निघून गेले, आणि मी पुन्हा वेडीच ठरले!
asim sarode on rahul narvekar (1)
“अध्यक्षांनी अपात्रतेबाबत चुकीचा निर्णय दिला, तर…”, कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंचं मोठं वक्तव्य
Rishi Sunak and Akshata Murthy
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता मूर्ती यांचा G20 मधून परतताच मोठा निर्णय, ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का
Sharad Pawar on Chhatrapati Shivaji Maharaj Wagh Nakhe
शिवाजी महाराजांच्या वाघनखांवरून वाद, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “मला काही…”

रस्त्याच्या मधोमध तुटलेल्या रेषचा अर्थ काय?

रस्त्याच्या मध्यभागी काही मीटर अंतरावर आपणास एकेरी तुटक पांढरी रेषा दिसली असेलच. याला इंग्रजीत ‘ब्रोकन व्हाईट लाइन’ असे म्हणतात. रस्त्याच्या मध्यभागी असलेली ही पांढरी तुटलेली रेषा तुम्हाला सांगते की, तुम्ही रस्त्यावर गाडी चालवत असताना यू टर्न घेऊ शकता किंवा लेन बदलू शकता. परंतु या वेळी आपणास सांभाळून गाडी चालवणे देखील खूप महत्त्वाचे आहे.

रस्त्याच्या मध्ये असणाऱ्या दोन पांढऱ्या रेषांचा अर्थ काय?

रस्त्याच्या मधोमध दोन पांढऱ्या रेषा असल्या तरी तुम्ही ओव्हरटेक करू शकत नाही. रस्त्याच्या मधोमध जिथे जिथे दोन पांढऱ्या रंगाच्या रेषा एकत्र दिसतील तिथे एकाच लाईनने गाडी चालवावी लागेल, तेथे चुकूनही ओव्हरटेक करू नका.

रस्त्यावरील पिवळ्या रेषांचा अर्थ काय?

जर रस्त्यावर पांढऱ्या ऐवजी पिवळ्या रंगाची सिंगल लाइन असेल तर तुम्ही तिथे ती पिवळी रेषा ओलांडू शकत नाही. तुम्ही तुमच्या स्वत:च्या रांगेत राहून वाहने पास करू शकता आणि ओव्हरटेक करू शकता परंतु क्रॉस करू शकत नाही.

दोन पिवळ्या रेषेचा अर्थ काय?

रस्त्यावर जर दोन पिवळ्या रेषा असतील तर तुम्ही ओव्हरटेक करू शकत नाही किंवा पुढे जाऊ शकत नाही. रस्त्याच्या कडेला पिवळी लाईन असल्यास तुम्ही तुमचे वाहन पार्क करू शकत नाही. अशा रस्त्यावर तुम्ही तुमची गाडी किंवा वाहन उभे केल्यास तुमच्यावर दंड आकारला जाईल.

मित्रांनो, रस्त्यावर वाहन चालविणाऱ्या प्रत्येकाला या रेषांचा अर्थ माहीत झाल्यास तो कधीही रस्ता अपघाताला बळी पडू शकत नाही. कारण, या रेषाच रस्त्यावरून मार्गक्रमण करीत असताना दिशानिर्देशांचे काम करीत असतात.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: What do the different lines and colors on the road mean in india heres know pdb

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×