आजकाल बरेचसे लोक पबमध्ये जाऊन डिंक्स घेत असतात. ज्या लोकांना ड्रिंक्स घ्यायची सवय असते, अशा लोकांकडून कॉकटेल, मॉकटेल असे शब्द ऐकायला मिळतात. त्यातील बऱ्याचशा जणांना या दोन्ही शब्दांमधील फरक ठाऊक असतो. पण आपल्याकडे असेही काही लोक आहे जे कधीही पार्टी करत नाही किंवा ज्यांनी कधीही ड्रिंक केले नाही. अशा लोकांना कॉकटेल आणि मॉकटेल वेगवेगळे आहेत हे देखील माहीत नसते. या दोन्ही ड्रिंक्समध्ये वेगवेगळ्या गोष्टी असतात. हे ड्रिंक्स बनवण्याची पद्धतदेखील वेगवेगळी असते.
कॉकटेल म्हणजे काय?
पार्ट्यांमध्ये प्यायल्या जाणाऱ्या ज्या ड्रिंक्समध्ये अल्कोहोल असते, त्या ड्रिंक्सना कॉकटेल असे म्हटले जाते. सोप्या शब्दात ज्या पेयामध्ये बीयर, रम अशा गोष्टींचा समावेश असतो, ते कॉकटेल असते. कॉकटेल बनवण्यासाठी फळांचे रस, सोडा यांमध्ये बीयर, रम किंवा वोडका मिक्स केला जातो. मिश्रणानुसार या ड्रिंकमध्ये श्रेणी असतात. अल्कोहोल असल्याने कॉकटेल्सबाबत काही नियम तयार करण्यात आले आहे. या नियमांनुसार त्याची विक्री केली जाते. कॉकटेल बनवण्यासाठी विशिष्ट पद्धतीचा वापर केला जातो.




आणखी वाचा – बिअर व्हिस्कीपेक्षा ‘या’ दुधात असते जास्त अल्कोहोल! जर माणसाने एक घोटही घेतला तर…
मॉकटेल म्हणजे काय?
मॉकटेलमध्ये अल्कोहोल नसते. फळांचे रस, ज्यूस किंवा सोडा यांच्या मिश्रणाने मॉकटेल बनवले जाते. मॉकटेल डिंक्सच्या श्रेणीमध्ये अनेक डिंक्सचा समावेश होतो. यामध्ये अल्कोहोल नसल्याने कोणालाही या ड्रिंक्सचे सेवन करता येते. शिवाय त्याच्या विक्रीवरही बंधने नसतात. बाजारामध्ये विविध प्रकारचे मॉकटेल्स पाहायला मिळतात. मॉकटेल नॉन-अल्कोहोलिक असल्याने त्याचे सेवन करणाऱ्या व्यक्तीच्या शरीराला अपाय होत नाही.