Know About Automatic Car Gear System : आजच्या डिजीटल युगात ऑटोमॅटिक गाड्यांच्ये नवनवीन प्रयोग वेगाने केले जात आहेत. या कारचे अनेक विकल्प बाजारात वाढताना दिसत आहेत. ऑटोमॅटिक गिअर बॉक्सची कार मॅन्यूअल कारपेक्षा थोडी वेगळी असते. यामध्ये गिअर बदलण्याची समस्या नसते. तुम्हाला फक्त एकदाच गिअर टाकावा लागतो आणि त्यानंतर गाडी आरामात चालत राहते. यामध्ये क्लच पेडलही नसतात. त्यामुळे तु्म्ही तुमचा एक पाय आरामात ठेवू शकता.
ऑटोमॅटिक गिअरचा वापर करु शकता सोप्या पद्धतीने
ऑटोमॅटिक कारमध्ये तुम्ही पाहिलं असेल की, गिअरजवळ P,R,N,D आणि S अक्षर लिहिलेलं असतं. तर मॅन्यूअल कारमध्ये १,२,३,४,५,६ नंबर लिहिलेले असतात. पहिल्यांदा P,R,N,D आणि S पाहिल्यानंतर हे असामान्य वाटू शकतं. पण तुम्ही जेव्हा या अक्षरांचा अर्थ समजून घेता, तेव्हा ऑटोमॅटिक गिअरचा उपयोग खूप सरळ वाटतो.
P,R,N,D आणि S चा अर्थ काय?
जेव्हा तुम्ही ऑटोमॅटिक कार चालवता, त्यावेळी तुम्हाला फक्त P,R,N,D आणि S मोडवर लक्ष ठेवावं लागतं. जेव्हा तुम्ही कारला पार्क करत असता, त्यावेळी तुम्हाला गिअर लेव्हलला P मध्ये ठेवावं लागतं. यामुळे पार्किंग मोड सक्रीय होतो. जेव्हा तुम्हाला कार मागे चालवावी लागेत, त्यावेळी तुम्ही गिअर लेव्हल R मध्ये ठेवलं पाहिजे.
काय आहे N,S आणि D चा अर्थ?
जर तुम्ही सिग्नलवर असता आणि रेड लाईटवर किंवा अन्य ठिकाणी गाडी थांबवायची असते, तेव्हा गाडीच्या गिअर लेव्हलला N (न्यूट्रल)जवळ ठेवा. जेव्हा तुम्ही ड्राईव्हसाठी तयार असता, तेव्हा तुम्ही गिअरला D (ड्राईव्ह) मध्ये ठेवा. यामुळे तुमची गाडी D मोडमध्ये सुरु होते आणि आवश्यकतेनुसार गिअर ऑटोमॅटिक बदलतात. याशिवाय अनेक कारमध्ये S सुद्धा लिहिलेलं असतं. याचा अर्थ असा की, कार स्पोर्ट्स मोडमध्ये आहे. यामुळे कार अधिक पॉवरफुल परफॉर्मन्स देत असते.