India Smallest Airport: आजकाल प्रवास करणं आधीपेक्षा खूप सोपं झालं आहे. हल्लीच्या वेगवान जीवनात आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वेगाने पोहचायचे असेल तर विमानासारखा सध्या तरी दुसरा पर्याय नाही. सध्या ट्रेनने प्रवास करण्यापेक्षा लोकं विमानाने प्रवास करणं सोयीचं समजतात. कारण विमानाने प्रवास आरामदायी होतो, तसेच वेळ देखील वाचतो. विमानाने हजारो किमीचा प्रवास अवघ्या काही तासांमध्ये करता येत असतो. अनेक लोक विमानाने प्रवास करतात. विमानाने प्रवास करण्याचा आनंद काही वेगळाच असतो. विमानतळ (Airport) एक अशी जागा आहे, जिथे विमाने उतरू शकतात किंवा टेक ऑफ करू शकतात. पण तुम्हाला भारतातील सर्वात लहान विमानतळ माहितीये का? जिथे एका वेळी एकच विमान उतरू शकतं. हे विमानतळ कुठे आहे, जाणून घेऊया…
भारतात दररोज मोठ्या प्रमाणात हवाई वाहतूक होते. देशातील विविध शहरांत विमानतळं आहेत. यातील काही विमानतळं ही आंतरराष्ट्रीय आहेत, तर काही विमानतळांहून देशांतर्गत वाहतूक होते. विमानतळ ही विमानांना उड्डाण आणि उतरण्यासाठी एक निश्चित जागा आहे. विमानतळावर विमानांसाठी धावपट्टी, टर्मिनल इमारती आणि इतर आवश्यक सुविधा असतात. हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे भारतातील सर्वात मोठे विमानतळ आहे. तर भारतातील सर्वात लहान विमानतळ कुठे आहे, जाणून घ्या…
देशातील सर्वात लहान विमानतळ ‘या’ ठिकाणी
भारतात अनेक विमानतळ आहेत, पण भारतातील ‘बलजेक‘ विमानतळ हे देशातील सर्वात लहान विमानतळ आहे. याला तुरा एअरपोर्ट असेही म्हटले जाते. हे मेघालय राज्यात ईशान्येला ३३ किलोमीटर अंतरावर आहे. विशेषत: हे फक्त २० सीटर विमान डॉर्नियर २२८ साठी तयार केले आहे. या विमातळाचा विस्तार वाढवण्याची मागणी केली जात आहे. या विमानतळावर लहान रनवे आहे. या रनवेचा विस्तार फक्त एक किमीपर्यंत आहे. छोट्या विमानांसाठी या रनवेचा वापर होतो.
या विमानतळावर केवळ एक किलोमीटरची धावपट्टी आहे, ज्यावर फक्त छोटी विमाने उतरवली जातात. या कारणास्तव याला देशातील सर्वात लहान विमानतळ म्हटले जाते. या विमानतळाच्या प्रकल्पाचा प्रस्ताव १९८३ मध्ये देण्यात आला होता आणि १९९५ मध्ये या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली, त्यानंतर २००८ मध्ये या विमानतळाचं बांधकाम पूर्ण करण्यात आलं; यासाठी १२.५२ कोटी रुपयांचा निधी वापरण्यात आला.