अंतराळवीरांचे सूट हे नेहमी आपल्याला दोन भिन्न रंगांचे दिसतात. कधी ते आपल्याला पांढरा रंगाच्या तर कधी नारंगी रंगाच्या सूटमध्ये दिसतात. जेव्हा तुम्ही टीव्हीवर नवीन अंतराळ मोहिमेशी संबंधित बातम्या पाहता तेव्हा तुम्हाला अंतराळवीर नारंगी रंगाच्या सूटमध्ये दिसतात. तर जेव्हा अंतराळ संस्था अंतराळातील अंतराळवीरांची छायचित्रे शेअर करतात तेव्हा ते पांढऱ्या रंगाच्या सूटमध्ये दिसतात. परंतु अंतराळवीरांच्या सूटमध्ये नेमका काय फरक असतो जाणून घेऊ…

दोन रंगांच्या सूटची वेगवेगळी नावे

नारंगी रंगाच्या स्पेस सूटला Advanced Crew Escape Suit (ACES) असे म्हणतात. तर पांढऱ्या रंगाच्या स्पेस सूटला Extravehicular Activity (EVA) Suit असे म्हणतात. पण दोन वेगवेगळे सूट घालण्यामागचे कारण काय आहे जाणून घेऊ.

नारंगी सूट घालण्यामागचे कारण काय?

स्पेस सूटचा रंग नारंगी असण्यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे हा रंग इतर रंगांपेक्षा अगदी भडक आणि उठावदार दिसतो. नारंगी रंगाचा सूट हा एन्ट्री सूट असतो. या रंगाचे सूट कोणत्याही लँडस्केप आणि समुद्रात दिसतो. अंतराळवीर प्रक्षेपणाच्या वेळी नारंगी रंगाचा सूट घालतात. कारण प्रक्षेपणाच्या वेळी रॉकेट समुद्रावरून जातात, अशा परिस्थितीत प्रक्षेपणाच्या वेळी कोणतीही अनुचित घटना घडली आणि अंतराळवीर समुद्रात पडले तर नारंगी रंगामुळे ते सहज दिसू शकतात. याच कारणामुळे अंतराळवीर प्रक्षेपणाच्या वेळी अंतराळातून परतताना नारंगी सूट घालतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पांढरा सूट घालण्यामागचे कारण काय?

पांढरा रंग हा सूर्यप्रकाश प्रतिबिंबित करतो. तसेच अंतराळातील गडद वातावरणात हा रंग सहज उठून दिसतो. म्हणून अंतराळवीर अंतराळात पांढरा सूट घालतात. याशिवाय पांढऱ्या सूटमध्ये वॉटर कूलिंग सिस्टम असते, ज्यामुळे इतर जागेत टिकून राहण्यास मदत होते. हा EVA सूट शरीरातील घाम रिसायकल करतो, ज्यामुळे अंतराळवीराचे शरीर कोणत्याही कठीण परिस्थितीत थंड राहू शकते.