अनेक माल गाड्या आणि प्रवासी वाहतुकीच्या रेल्वे निमितपणे रुळांवरून धावत असतात. रेल्वेचं हजारो किलो वजन सहन करत वारा, पाऊस, सूर्यप्रकाश आणि अनेक नैसर्गिक आपत्तींना रेल्व रुळ तोंड देत असतं. हे रेल्वे ट्रॅक लोखंडाचे असतात तरीही पाणी आणि वारा यांच्या संपर्कात येऊनही ते गंजत नाहीत. मग तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का की, रेल्वे रुळ गंजत का नाहीत? तसेच त्यांना गंज न येण्याची कारणे काय आहेत? जाणून घ्या.

रेल्वे रुळ का गंजत नाही?

रेल्वे रुळ का गंजत नाही हे जाणून घेण्याआधी, लोखंडाला का गंज येतो हे जाणून घेऊ. जेव्हा लोखंडापासून बनवलेल्या वस्तू ओलसर हवेत किंवा ओले झाल्या तर त्या ऑक्सिजनवर प्रतिक्रिया देतात, यामुळे लोखंडावर आयरन ऑक्साईडचा एक तपकिरी थर जमा होतो.

kids at home
शाळांना सुट्ट्या लागल्या, मुलांना कुठे ठेवायचं? पालकांच्या प्रश्नांची सोपी उत्तरे!
indian railways irctc rpf caught 21 people in ac coach without tickets from bhagalpur district of bihar
रेल्वेमधून विनातिकीट प्रवास करताय? मग ‘हा’ VIDEO पाहाच, तुम्हालाही भरावा लागू शकतो ‘इतका’ दंड
balmaifal article, story for kids, water literacy, Water importance, do not waste water lesson, story cum lesson for water, save water, kids and water, marathi article, loksatta article,
बालमैफल : जलसाक्षरता
f you're watching your blood sugar levels, you might want to keep an eye on how much bread you're pairing with your eggs
अंडे ब्रेडबरोबर खावे की ब्रेडशिवाय? रक्तातील साखर वाढू नये म्हणून अंडे कसे खावे? जाणून घ्या अंडी खाण्याचा उत्तम मार्ग

हा तपकिरी रंगाचा थर लोखंडाचा ऑक्सिजनसह झालेल्या अभिक्रियेतून आयरन ऑक्साईड बनण्यामुळे होतो, ज्याला धातूचा गंज किंवा लोह गंजणे म्हणतात. हे आर्द्रतेमुळे होते आणि हा थर ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड, सल्फर, आम्ल इत्यादींच्या समीकरणाने तयार होते. हवा किंवा ऑक्सिजन नसेल तर लोखंड गंजते.

रेल्वे ट्रॅकमध्ये विशेष काय असते?

रेल्वे ट्रॅक बनवण्यासाठी खास प्रकारचे स्टील वापरले जाते, जे फक्त लोखंडापासून बनवले जाते. स्टील आणि मॅंगनीज मिसळून रेल्वे ट्रॅक बनवले जातात. मॅंगनीज स्टील हे स्टील आणि मॅंगनीज यांचे मिश्रण आहे. त्यात १२ टक्के मॅंगनीज आणि १ टक्के कार्बन आहे. यामुळे ऑक्सिडेशन होत नाही किंवा खूप हळू होते, त्यामुळे ट्रॅक अनेक वर्षे गंजत नाहीत. अशावेळी रेल्वे ट्रॅक गंजले तर रेल्वे ट्रॅक वारंवार बदलावे लागतील आणि त्यासाठी खर्चही खूप येईल.

त्याच वेळी, रेल्वे ट्रॅक सामान्य लोखंडाने बनवले असते तर हवेतील ओलाव्यामुळे गंजले असते. अशावेळी ट्रेन वारंवार ट्रॅक बदलत असल्याने रेल्वे अपघाताची शक्यता असते. अशा परिस्थितीत रेल्वे ट्रॅक तयार करण्यासाठी विशेष साहित्य वापरले जाते. या वापरलेल्या लोखंडामध्ये कार्बनचे प्रमाण कमी असते, त्यामुळे त्यात गंज येण्याची शक्यता कमी होते.