बहुतेक जण दारू पिण्याचे शौकिन असतात. त्यात आपल्या देशात अनेकांना थंड पाणी किंवा बर्फासोबत दारू प्यायला आवडते. फ्रिजरमध्ये पाण्याची बाटली काही वेळ ठेवली तरी त्यातील पाण्याचे बर्फात रूपांतर होते हे तुम्ही पाहिले असेल. पण, फ्रिजमध्ये दारू ठेवली, तर ती गोठत नाही? असे का होते? तुम्ही कधी विचार केला का? इतकेच नाही, तर डिप फ्रिजरमध्ये ठेवली तरी दारू गोठत नाही. पण, असे का होते तुम्हाला माहीत आहे का; नाही ना! चला तर मग जाणून घेऊ …
आधी आपण समजून घेऊ की, कोणताही द्रव पदार्थ फ्रिजरमध्ये ठेवल्यावर का गोठतो? याचे कारण म्हणजे प्रत्येक द्रव पदार्थामध्ये एक आंतरिक ऊर्जा असते; जी आसपासच्या वातावरणाच्या तापमानावर अवलंबून असते. जेव्हा सभोवतालचे तापमान कमी होते, तेव्हा ही ऊर्जादेखील कमी होऊ लागते आणि जेव्हा ती शून्यावर पोहोचते तेव्हा कम्पाऊंडचे रेणू एकमेकांना चिकटू लागतात. परिणामी तो द्रव पदार्थ घन रूप धारण करतो किंवा त्याऐवजी ते घनरूप बनतो.
मग दारू का गोठत नाही?
कोणताही द्रव पदार्थ गोठणे हा त्यातील वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून असतो. अल्कोहोलमध्ये काही ऑरगॅनिक मॉलिक्यूल आढळतात; जे ते अल्कोहोलला गोठवू देत नाहीत. द्रव पदार्थाचे घनीकरण त्याच्या गोठण बिंदूवर अवलंबून असते. प्रत्येक पदार्थाचा गोठण बिंदू वेगळा असतो. गोठण बिंदू हे असे तापमान आहे; ज्यावर पदार्थ गोठण्यास सुरुवात होते. जसे पाणी ० अंश सेंटिग्रेडवर गोठण्यास सुरुवात होते. म्हणूनच त्याचा गोठण बिंदू ० अंश सेंटिग्रेड आहे. त्याचप्रमाणे इतर द्रव आणि अल्कोहोलमध्येही भिन्न गोठण बिंदू असतात.
दारूचा गोठण बिंदू किती?
दारूचा गोठण बिंदू ११४ अंश सेंटिग्रेड आहे. त्यानुसार दारू गोठण्यासाठी ते -११४ अंश सेंटिग्रेडपेक्षा कमी तापमानात ठेवावे लागते. गोठण बिंदूमधील फरक द्रवाच्या रेणूंवर अवलंबून असतो. पाण्याचे रेणू इथेनॉलच्या कोणत्याही रेणूपेक्षा अधिक घट्ट बांधलेले असतात. म्हणूनच त्याचा गोठण बिंदूदेखील कमी आहे.
दारू कोणत्या फ्रिजमध्ये गोठवता येते?
कोणत्याही घरगुती फ्रिजचे तापमान ० ते -१० किंवा कमाल -३० अंश सेंटिग्रेड असते. अशा परिस्थितीत त्यांच्यामध्ये पाणी सहज गोठते; परंतु अल्कोहोल गोठत नाही. मजेशीर गोष्ट अशी आहे की, असे कोणतेही रेफ्रिजरेटर नाही जे -११४ अंश सेंटिग्रेड इतके कमी तापमान निर्माण करू शकते. म्हणून असे म्हणता येईल की, घरगुती रेफ्रिजरेटरमध्ये दारू गोठवली जाऊ शकत नाही.