Why female astronauts do not tie their hair in space : भारतीय वंशाची आणि नासाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स अखेर नऊ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर पृथ्वीवर उतरली आहे. या नऊ महिन्यांच्या कालावधीत सुनीता विल्यम्स यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झालेले आपण सर्वांनी पाहिले. अंतराळात त्यांचे केस आपण अनेकदा तरंगताना पाहिले. त्यांचे कुरळे केस विशेष आकर्षण ठरले आहे.

काही दिवसांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी सुनीता विल्यम्स यांच्या केसावर विनोद केला होता. एका पत्रकार परिषदेत ट्रम्प यांनी विनोदी पद्धतीने म्हटले होते, “मी त्या महिलेला पाहत आहे, तिचे केस खूप छान आणि दाट आहेत, ही थट्टा नाही.” तेव्हापासून त्यांच्या केसाची खूप चर्चा आहे. तुम्हाला कधी प्रश्न पडला का की सुनीता विल्यम्स कधीच अंतराळात केस का बांधत नाही. आज आपण त्याविषयी जाणून घेणार आहोत

महिला अंतराळवीर अंतराळात केस का बांधत नाही?

अतिशय कमी गुरुत्वाकर्षणात, पृथ्वीवर केस जसे नैसर्गिकरित्या गळतात तसे अंतराळात गळत नाहीत. अनेक महिला अंतराळवीर त्यांचे केस बांधत नाही, त्यामागील काही खालील कारणे –

केस बांधण्याची गरज नाही : गुरुत्वाकर्षणामुळे केस खाली ओढले जात नाही, ते वर तरंगतात त्यामुळे केस बांधण्याची गरज नाही.

केस धुण्यास सोपे : अंतराळवीर ड्राय शाम्पू आणि ओला न होणारा टॉवेल वापरतात, ज्यामुळे त्यांचे केस नैसर्गिकरित्या तरंगतात.

व्हेटिंलेशन सिस्टिम सुकण्यास मदत करते : आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातील (ISS) हवेचा प्रवाह ओलावा शोषून घेण्यास मदत करते, ज्यामुळे ब्लो ड्रायरची गरज पडत नाही.

वैयक्तिक पसंती : काही अंतराळवीरांना त्यांचे केस मोकळे ठेवणे आवडते. विशेष म्हणजे केस त्यांच्या चेहऱ्यावर येत नाहीत, तसेच त्यांना केसाचा कोणताही त्रास होत नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नासाचे अंतराळवीर करेन नायबर्ग यांनी एकदा अंतराळात त्यांच्या केसांची काळजी कशी घेतात, याविषयी सांगितले होते. २०१३ मध्ये आयएसएसवर असताना, नायबर्ग यांनी शून्य गुरुत्वाकर्षणात त्यांचे लांब केस कसे धुतले याचा एक यूट्यूब व्हिडीओ रेकॉर्ड केला होता.