एखाद्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व हे त्याच्या बोलणं, चालणं आणि वागण्यावरून समजतं. त्याचप्रमाणे एखादी व्यक्ती कोणत्या रंगाचे कपडे, वस्तू वापरते यावरूनही त्याच्या व्यक्तिमत्वाचा अंदाज घेता येतो. रोज आपण चांगले कपडे घालून घराबाहेर पडतो. यावेळी कपडे मॅचिंग आहेत ना याकडेही नीट लक्ष देतो. सगळेच शर्ट, टी-शर्ट घालतात, त्याला खिसाही असतो, पण तुम्ही नीट पाहिलं असेल तर तुमच्या लक्षात येईल की शर्टचा खिसा हा फक्त डाव्या बाजूला असतो. पण असं का? याचा कधी विचार केलाय का? पॅन्ट असोत किंवा शर्ट असोत या दोघांमध्ये आधिपासूनच खिसा असतोच. बहुतांश पुरुषांच्या शर्टाच्या खिसा असलेला तुम्ही पाहिला असेल. ज्यामध्ये पेन, पैसे, तिकिटं किंवा फोन ठेवला जातो. चला तर मग जाणून घेऊया शर्टचा खिसा हा फक्त डाव्या बाजूला का असतो.

शर्टाच्या डाव्याबाजूलाच का खिसा असतो?

यामागची अनेक कारणं सांगितली जातात. त्यापैकी एक म्हणजे माणसाची उजव्या हाताने काम करण्याची सवय. उजवा हात वापरुन डाव्या हाताच्या ठिकाणी कोणत्याही गोष्टी ठेवणे किंवा काढणे सोपं जातं. क्रिस क्रॉस प्रक्रिया ही नेहमीच कोणतंही काम करण्यासाठी जास्त चांगली असते. जसे आपण उजव्या हाताने डावीकडील काम करु शकतो, तर डाव्या हाताने उजवीकडील काम करणं जास्त सोपं होतं.

हेही वाचा – …म्हणून विमानाच्या खिडकीवर छोटं छिद्र असतं? जाणून घ्या यामागचं रंजक कारण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तसं पाहिलं तर, भारतात साडी घालण्याची परंपरा आहे. त्यामुळे साडीला खिसा असण्याची कल्पनाच न केलेली बरी. पण, महिला इतर कपडे घालतातच की! तरीही त्यांच्या कपड्यांना खिसा दिसत नाही. का? पहिल्यांदा पुरुषांच्या कपड्यांना खिसा असण्याची पद्धत कधी सुरू झाली, हे आपल्याला माहिती पाहिजे की… तर १६०० शतकाच्या दरम्यान पहिल्यांदा पुरुषांच्या कपड्यांना खिसे लागले. पुरुषांच्या कपड्यांच्या इतिहासात खिसा लावणे, हा महत्वाचा निर्णय होता. पुरुषांच्या शर्ट, ट्राउझर्स, जीन्स, लोअर्स, शॉर्ट्स आणि अगदी टी-शर्टमध्ये खिसे बनवले जात होते, परंतु महिलांच्या शर्टमध्ये पूर्वी खिसे नव्हते. हा ट्रेंड खूप नंतर आला आहे, त्यांच्या इतर कपड्यांनाही खिसा नसायचा. तुम्ही अशा अनेक मुलींच्या जीन्स पाहिल्या असतील ज्यांना खिसा नसतो.