आपल्या निसर्गात वेगवेगळ्या प्रजातीचे प्राणी, पक्षी आढळतात. त्या प्रत्येक प्राणी, पक्ष्यांचे वेगवेगळे वैशिष्ट असतात. असे अनेक प्रकारचे जीव पृथ्वीवर जिवंत आहेत, तर काही नामशेष झाले आहेत किंवा नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. यापैकी एक म्हणजे वटवाघूळ. आपल्या समाजात वटवाघळांबाबत बऱ्याच अंधश्रद्धा पसरल्या आहेत. कोरोनाच्या काळात वटवाघूळ खूपच चर्चेत होतं. वटवाघळांमुळे कोरोना पसरल्याचं म्हटलं जात होतं. याच वटवाघळांबद्दल अनेक रंजक गोष्टी आहेत. त्यापैकी एक म्हणजे ते अंधारातच का उडतं? हे आज आपण जाणून घेणार आहोत.

वटवाघूळ एक असा आकर्षक प्राणी आहे; ज्याच्याकडे इकोलोकेशन ( Echolocation ) नावाचं एक विशिष्ट कौशल्य आहे. ज्याद्वारे तो रात्री अंधारात शिकार करतो आणि त्याचा पुढचा प्रवास देखील‌ करतो.

Mohol Constituency Politics
Mohol Constituency Politics : मोठी बातमी! शरद पवारांनी मोहोळमध्ये उमेदवार बदलला; सिद्धी कदम यांच्याऐवजी ‘या’ नेत्याला दिली उमेदवारी
Bangladesh pulled plug on key internet deal with India
भारताला मोठा धक्का; बांगलादेश आणि भारताचा इंटरनेट करार…
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
who are intersex people
इंटरसेक्स लोक कोण असतात? समाजात वावरताना त्यांना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतो?
Indian Army dog Phantom
Jammu Kashmir Encounter: दहशतवाद्यांशी लढताना भारतीय लष्कराचा ‘फँटम’ श्वान शहीद; लष्काराकडून हळहळ व्यक्त
Bullet Train Bridge Collapse in Anand Gujarat
Bullet Train Bridge Collapse : बुलेट ट्रेन प्रकल्पाचा पूल कोसळला, तीन मजूर ठार; ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकले, बचावकार्य जारी
Shrinivas Vanga cried palghar candidature
Shrinivas Vanga: ‘उद्धव ठाकरे देवमाणूस, एकनाथ शिंदे घातकी’, गुवाहाटीला गेलेल्या श्रीनिवास वनगांचे तिकीट कापले; कालपासून नॉट रिचेबल, कुटुंब चिंतेत
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

हेही वाचा – वाईड बॉलवर फलंदाज कसा बाद होतो? काय आहे ICC चा ‘तो’ नियम? ज्यावरून धोनीच्या बायकोने घातलेली हुज्जत

महत्त्वाचं म्हणजे वटवाघळं रात्रीच्या अंधारात रस्ता शोधण्यासाठी ध्वनी लहरींचा वापर करतात. त्यांचा आवाज काळ्याकूट अंधारात शिकार शोधण्यासाठी मदत करतो. अंधारात उडणं हे वटवाघळांसाठी सुरक्षित असतं. त्यामुळे ते स्वतंत्रपणे उडू शकतात.

वटघाटळांना पटकन येतं ऐकू

bats ( Photo Credit - Indian Express)
Bats ( Photo Credit – Indian Express)

अंधारात मच्छरांसारखे कीटक शोधण्यासाठी वटवाघूळ इकोलोकेशनचा वापर करतात. हे कौशल्य त्यांना रात्रीच्या वेळीस कुशल शिकारी बनवतं. वटवाघळांची ऐकण्याची शक्ती खूप चांगली आणि वेगवान असते. त्यामुळे त्यांना अंधारात प्रवास करण्यास मदत होते. वटवाघळांचे कान आजूबाजूचा धोकादायक आवाजही पटकन ऐकतात आणि सावध होतात.

हेही वाचा – जागतिक वारसा स्थळे कशी निवडली जातात? घ्या जाणून…

तसंच वटवाघूळ रात्री अंधारात उडाल्यामुळे थंड राहतात आणि त्यांच्या उर्जेचा बचाव होतो. यामुळे ते शिकार शोधण्यासाठी दूरदूर पर्यंत प्रवास करू शकतात. शिवाय अंधारात कीटक बाहेर फिरतात. त्यामुळे वटवाघळांना खूप शिकारी मिळते. वटवाघूळ छोटे कीटक खूप खातात.

हेही वाचा – Aadhaar Card Updates: आधार कार्डवरील फोटो, नाव, पत्ता कितीवेळा बदलू शकतो? याबाबत काय आहेत नियम? जाणून घ्या

वटवाघळं नेहमी उलटी का लटकतात?

जमिनीवरून वटघाळांना उडता येत नाही. जमिनीवरून उडण्यासाठी जेवढी ताकदीची आवश्यकता असते तेवढी वटवाघळ्यांच्या पंखांमध्ये नसते. तसेच त्यांचे मागचे पाय लहान आणि अविकसित असतात. हवेत उलटं लटकल्यामुळे त्यांना झेप घेण्यासाठी वेग मिळतो. उंच ठिकाणावर चढण्यासाठी वटवाघळं समोरच्या पंजांचा वापर करतात. महत्त्वाचं म्हणजे उलटं लटकल्यामुळे त्यांची शिकाऱ्यांपासून सुरक्षा होते.

Story img Loader