Women Remove Bra To Pray: जगभरात इतिहासाचा वारसा असणारी अनेक पर्यटन स्थळे आहेत. तर काही ठिकाणं ही तिथे प्रचलित प्रथा व रीतींमुळे खास ठरतात. आता असंच एक पर्यटन स्थळ फार चर्चेत आलं आहे. या जागेचे वैशिष्ट्य म्हणजे इथे प्रार्थना करताना महिला व तरुणी आपली ब्रा काढून समोरील कुंपणावर अडकवतात. इथे आल्यावर ब्रा दान करण्याची रीतच सुरु झाली आहे. न्यूझीलंड मधील हे ठिकाण सेंट्रल ओटागो कार्डोना म्हणून प्रसिद्ध आहे. हे ‘ब्राचे कुंपण’ हे जगभरातील पर्यटकांनी भेट दिलेले जगप्रसिद्ध हॉटस्पॉट आहे. कार्डोना ब्रा कुंपणावर आजवर इतक्या महिलांनी आपली ब्रा काढून अडकवली आहे की आता इथे तुम्हाला ब्रा चे सर्व शेप व साईझचे नमुने सापडतील.

पर्यटनाचे हे आकर्षण सेंट्रल ओटागोमध्ये आहे. इथे पहिल्यांदा कुणी आपली ब्रा काढून टांगली होती हे माहित नाही पण साधारण १९९९ च्या सुमारास इथे जवळच राहणाऱ्या लोकांना कुंपणावर ४ ब्रा लटकलेल्या सापडल्या होत्या. असं काहीतरी पाहून आधी लोक थोडेसे गोंधळले, घाबरले पण नंतर हळूहळू इथे कुंपणावरील ब्रा ची संख्या वाढायला लागली. आता, कुंपणावर ब्रा टांगणे हा एक प्रकारचा लोकप्रिय विधी बनला आहे.

ब्रा चोरी होऊ लागल्या अन मग..

इथे एकीकडे कुंपणावरील ब्रा ची संख्या वाढायला लागली आणि तिथे चोरांच्या टोळ्या सक्रिय व्हायला लागल्या. एका चोराने रात्रीच्या वेळी ब्रा कापण्यास सुरुवात केली आणि त्यामुळेच कुंपणाच्या लोकप्रियतेत भर पडली. अखेरीस, कुंपण इतके लोकप्रिय झाले, की त्यामुळे मुख्य महामार्गावर वाहतूक कोंडी होऊ लागली. यामुळे हे कुंपण केली स्पॅन्सच्या ड्राइव्हवेवर हलवावे लागले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हे ही वाचा<< तुम्हीही ‘या’ ट्रेनमध्ये १३ किमी फुकट प्रवास करू शकता! भारतातील रेल्वेचा हा Route माहितेय का?

दरम्यान, २०१५ मध्ये स्तनाच्या कर्करोगाच्या निधी उभारणीच्या कार्यक्रमादरम्यान या कुंपणाला ‘ब्रॅड्रोना’ असे नाव पडले. याच माध्यमातून सुमारे $३०००० गोळा केले होते.