World Hippo Day 2023: जागतिक हिप्पो दिवस दरवर्षी १५ फेब्रुवारीला साजरा केला जातो. हा दिवस सर्वात मोठ्या आकाराच्या प्राण्यांपैकी एक असलेल्या हिप्पो म्हणजेच पाणघोड्याला समर्पित आहे, ज्याची संख्या आता कमी होत आहे. हत्ती आणि गेंड्यानंतर हिप्पो हा महाकाय उभयचर प्राणी आहे. जागतिक हिप्पो दिवसाचे उद्दिष्ट या प्राण्यांच्या संरक्षणाबाबत एकत्र येत जागरूकता वाढवणे आहे. तसंच मानवासाठी या प्राण्याचे अस्तित्त्व महत्त्वाचे असल्याने त्याच्या संवर्धनासाठीच्या प्रयत्नांना बळ देण्याची गरज आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जाणून घ्या या दिवसाचा इतिहास

हिप्पो हे महाकाय उभयचर प्राणी आहेत. जे प्रामुख्याने अफिकेत आढळतात. Hippopotamus हा लॅटिन शब्द आहे जो ग्रीक भाषेपासून बनलेला आहे. ‘Hippos’ म्हणजे घोडा आणि ‘potamos’ म्हणजे नदी. ज्याचा एकत्रित अर्थ ‘पाणघोडा असा होतो’. जरी याचे नाव पाणघोडा असले तरी याचा घोड्याशी काहीही संबंध नाही. प्राणीशास्त्राच्या दृष्टीने ते डुकरांचे दूरचे नातेवाईक आहेत. या शाकाहारी प्राण्याला नद्या आणि तलावांच्या काठावर आणि त्यांच्या गोड पाण्यात राहायला आवडते. सर्वात अलीकडील संशोधनात असे आढळून आले आहे की ते व्हेल प्रजातींशी अधिक संबंधित आहेत.

( हे ही वाचा: भारतात ‘हा’ आहे सर्वात लहान रेल्वे मार्ग; अवघ्या ९ मिनिटांत संपतो प्रवास..)

महत्व

मनुष्याच्या फायद्यासाठी पाणघोड्याची होणारी शिकार, हवामान बदल आणि वाढती लोकसंख्या यामुळे त्याच्या प्रजाती नष्ट होण्याचा धोका वाढत आहे. २००६ मध्ये इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचरने पाणघोड्यांना ‘असुरक्षित प्रजाती’ म्हणून घोषित केले. जागतिक हिप्पो दिवस हा जगभरातील प्राणी तज्ञांसाठी जागरूकता वाढवण्यासाठी आणि या प्राण्यांचे संरक्षण करण्याच्या गरजेबद्दल लोकांना शिक्षित करण्याची एक योग्य संधी आहे. पाणघोड्यांची संख्या घटणे ही मानवासाठीही चिंतेची बाब आहे. गोड्या पाण्याच्या परिसंस्थेचे संतुलन राखण्यात पाणघोड्याची महत्वाची भूमिका आहे. त्यामुळे पाणघोड्याचे आणि त्याच्या अधिवासाचे संरक्षण आवश्यक आहे.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: World hippo day 2023 date know history and significance of the day gps
First published on: 15-02-2023 at 16:09 IST