नवी दिल्लीसह देशाच्या अनेक राज्यात यमुना नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. दिल्लीत झालेल्या महापूरानंतर आग्रामध्येही यमुना नदीच्या पाण्याची पातळी वाढलीय. यमुना नदीचं पाणी ताजमहलच्या भिंतीपर्यंत आल्याचं समजते आहे. मागील काही वर्षांमध्ये असं पहिल्यांदाच घडलं आहे. यमुनाचं वाढतं पाणी पाहून लोकांना वाटत आहे की, हे पाणी ताजमहलमध्ये शिरेल. ज्यामुळे ऐतिहासिक वास्तूचं नुकसान होईल.मात्र, काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, यमुना नदीच्या पाण्याची पातळी आणखी वाढली, तरीही ताजमहलचं काहिच नुकसान होणार नाही. तसंच पूर आल्यावरही ताजमहलमध्ये पाणी शिरणार नाही. याच पार्श्वभूमीवर एक प्रश्न उपस्थित झाला आहे की, पाण्याची पातळी जास्त असल्यावरही ताजमहलमध्ये पाणी शिरणार का नाही?

यमुना नदीचं पाणी ताजमहलच्या भिंतींच्या जवळ आल्याचं मागील वर्षांमध्ये पाहायला मिळालं नव्हत. परंतु, यंदाच्या मुसळधार पावसामुळे असं चित्र पहिल्यांदाच पाहायला मिळत आहे. याआधी १९७८ मध्ये असं घडलं होतं. त्यावेळीही यमुना नदीचं पाणी भिंतींजवळ आलं होतं. आता फोटोमध्ये पाहू शकता की, ताजमहलच्या मागे बनवण्यात आलेलं गार्डन पाण्यात बुडलं आहे आणि पाणी ताजमहलच्या खूप जवळ आलं आहे. परंतु, ताजमहलवर या पाण्याचा काहीही परिणाम होऊ शकत नाही.

switching your exercise routine have several benefits
काही ठराविक महिन्यानंतर व्यायामामध्ये बदल करणे आवश्यक आहे? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
china people punished for not paying debt
जीवनावश्यक वस्तू खरेदी करणेही कठीण; कर्ज फेडू न शकणाऱ्यांना चीन कशी शिक्षा करत आहे?
thief ATM Kalyan, ATM Kalyan,
तब्बल ९२ एटीएम कार्डद्वारे डल्ला मारणाऱ्या चोराला कल्याणमध्ये अटक, आधीच १६ गुन्हे दाखल असल्याचंही उघड
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या

नक्की वाचा – ‘हे’ आहेत जगातील सर्वात खतरनाक ‘Island’! इथे गेल्यावर परत येण्याची शक्यता कमीच, कारण वाचून तुम्हीही व्हाल थक्क

पूर आल्यावरही ताजमहलमध्ये पाणी शिरणार नाही

युनेस्को जागतिक स्थळांची पाहणी करणाऱ्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआई) यांचं म्हणणं आहे की, पाण्याने या ऐतिहासिक वास्तूला कोणत्याही प्रकारचा धोका नाही. एएसआईचे अधिक्षक राज कुमार पटेल यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार, पूराचं पाणी ताजमहलमध्ये प्रवेश करु शकणार नाही. या वास्तूला अशाप्रकारे डिजाईन करण्यात आलं आहे की, कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होणार नाही. महापूर जरी झाला, तरीही मकबऱ्यात पाणी प्रवेश करू शकणार नाही, असं अधिकाऱ्यांचही म्हणणं आहे.

मुख्य मकबरा एका उंच चबूतऱ्यावर बनवला आहे. चमेली फर्शवर हे उभं करण्यात आलं आहे. तसंच यामध्ये ४२ विहिरी आहेत आणि त्यांच्यावर लाकडांचं बांधकाम करण्यात आलं आहे. ताजमहलला लाकडांच्या नीववर बांधण्यात आलं आहे. या लाकडांनी वैशिष्ट्य आहे की, पाण्यामुळे ते लाकूड आणखी मजबूत होतं. पाणी कमी झाल्यावर ताजमहलवर परिणाम होईल. कारण त्यामुळे लाकडांची मजबूती कमी होईल. पाण्याच्या माध्यमातूनच त्यांना ऑक्सिजन मिळतं आणि ते जास्त मजबूत होतात. आता आग्र्यात यमुनाचं पाणी ४९८ फूटांपर्यंत वाहत आहे. परंतु, पुढील काही दिवसांमध्ये नदीचं पाणी ५०० फूटांपर्यंत जाण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.