News Flash

लॅम्बॉर्गिनी : ‘इगोइस्टि’क

जगभरातील श्रीमंतांचं एक स्वप्न असतं; ते म्हणजे आपल्या आलिशान घराच्या दारात जगातल्या उत्तमोत्तम गाडय़ांची रांग लागलेली असावी. आणि त्या रांगेत रोल्स रॉइस पहिल्या क्रमांकावर असावी.

| May 23, 2013 01:41 am

लॅम्बॉर्गिनी : ‘इगोइस्टि’क

जगभरातील श्रीमंतांचं एक स्वप्न असतं; ते म्हणजे आपल्या आलिशान घराच्या दारात जगातल्या उत्तमोत्तम गाडय़ांची रांग लागलेली असावी. आणि त्या रांगेत रोल्स रॉइस पहिल्या क्रमांकावर असावी. रोल्स रॉइसच्या बाजूला लॅम्बॉर्गिनी असावी आणि मग त्यानंतर इतर गाडय़ांचा क्रमांक लागतो.. कारप्रेमींना भुरळ घालण्यात या दोन्ही गाडय़ांचा हातखंडा आहे. रोल्स रॉइसचा बाज जसा वेगळा तशी लॅम्बॉर्गिनीची ऐट वेगळी. दोन्ही आपापल्या स्थानी सर्वश्रेष्ठ आहेत. असो. लॅम्बॉर्गिनीचं एवढं कौतुक करायला निमित्त म्हणजे लॅम्बॉर्गिनीने वयाचं अर्धशतक पूर्ण केलंय.
इटलीतील उद्योजक फेरुशिओ लॅम्बॉर्गिनी यांनी ६०च्या दशकात जगातील सर्वोत्तम अशी सुपर कार बनवण्याचा ध्यास घेतला. एनिलिया रोमाग्ना प्रांतातील सॅन्टएॅग्टा येथे त्यांनी या सुपर कारनिर्मितीची मुहूर्तमेढ रोवली आणि गेल्या ५०वर्षांत त्याचा वटवृक्ष झाला आहे. आजच्या घडीला लॅम्बॉर्गिनीतील ८३१ कर्मचारी दरवर्षी १७०० सुपर कारची निर्मिती करतात.
पन्नासाव्या वाढदिवशी लॅम्बॉर्गिनीने इगोइस्टा या गाडीचे लाँचिंग केले आहे. गाडीचे रचनाकार अर्थातच वॉल्टर डिसिल्व्हा आहेत. विमानाच्या वेगाशी स्पर्धा करणारी सुपर कार या कल्पनेतून साकार झालेल्या या गाडीचे नाव मुद्दामच इगोइस्टा ठेवण्यात आले आहे. तिची रचनाही भन्नाट आहे. गाडीत एकच जण बसू शकणार आहे, दस्तुरखुद्द ड्रायव्हर.. मात्र, इगोइस्टा चालवणाऱ्याला ड्रायव्हर म्हणायचं नाही. पायलट म्हणायचं.. आणि तो गाडी चालवण्यासाठी बसणार ते सीट नसेल तर कॉकपिट असेल! या कॉकपिटमध्ये केवळ पायलटच बसू शकेल. विशेष म्हणजे कॉकपिट इजेक्टही करता येऊ शकते आणि या कॉकपिटची रचना अमेरिकन हवाई दलातील एॅपाचे हेलिकॉप्टरच्या प्रेरणेतून करण्यात आली आहे.
तांत्रिक वैशिष्टय़े

५.२ लिटरचे व्ही १० इंजिन
अश्वशक्ती ६००
फोर पॉइंट सीटबेल्ट
एलईडी क्लीअरन्स हेडलॅम्प
आणि रिअर लाइट्स
सुयोग्य ग्राऊंड क्लीअरन्स

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2013 1:41 am

Web Title: lamborghini egoistic
Next Stories
1 राजेशाही थाट
2 लंबी रेस की लिनिआ
3 प्रवास ‘ई-बाइक्स’चा..
Just Now!
X