News Flash

वाहन चालवण्याचे विधिग्रा नियम

दिनांक १ जुल १९८९ पासून रुल्स ऑफ रोड रेग्युलेशन लागू करण्यात आलेले आहेत.

मुंबई-पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गावर मर्यादेपेक्षा वेगाने वाहन चालविणाऱ्या ८३९ वाहनचालकांविरोधात दंडात्मक कारवाई

मोटार वाहन कायद्याच्या कलम ११८ नुसार केंद्र सरकारला भारतातील रस्त्यांवर मोटार वाहन चालवताना काय नियम असावे हे ठरवण्याचा अधिकार दिलेला आहे. त्यानुसार दिनांक १ जुल १९८९ पासून रुल्स ऑफ रोड रेग्युलेशन लागू करण्यात आलेले आहेत. यामध्ये एकूण ३३ मुख्य नियम आहेत. त्यापकी शेवटचा नियम क्रमांक ३३ खाली देण्यात येत आहे.

३३) प्रत्येक वाहन चालकाला मोटार वाहन कायदा १९८८ ची खालील कलमे माहीत असणे आवश्यक आहे. कलम ११२, ११३, १२१,१२२,१२५,१३२,१३४,१८५,१८६,१९४,२०७.

सदर कलमे खालीलप्रमाणे आहेत .

कलम १८६६ :- मानसिकदृष्टय़ा अथवा शारीरिकष्टय़ा तंदुरुस्त नसतांना वाहन चालविणे :- जर एखादी व्यक्ती एखाद्या सार्वजनिक ठिकाणी ती शारीरिकदृष्टय़ा अथवा मानसिकदृष्टय़ा अशा  आजाराने पीडित आहे की, ज्यामुळे त्याने वाहन चालविले तर त्यामुळे नागरिकांना धोका होऊ शकतो. असे त्याला माहीत असतानादेखील वाहन चालविताना आढळल्यास अशा व्यक्तीला न्यायालयाद्वारे पहिल्या गुन्ह्यासाठी रु. २००/- पर्यंत दंड आणि त्यापुढच्या गुन्ह्यासाठी रु. ५००/- पर्यंत दंड होऊ शकेल.

वाचकांशी सवांद साधतांना एक वर्ष कसे संपत आले आहे हे लक्षातदेखील आले नाही. पुढील वर्षांसाठी काहीतरी नवीन उपक्रम या ड्राइव्ह इटच्या माध्यमातून साकारावा असे योजले आहे.

नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल उत्तर भारतातील प्रदूषणामध्ये वाहनांचा असलेला वाटा या बाबी सध्या प्रामुख्याने चíचल्या जात आहेत. या सर्व बाबीवर चर्चा करत राहू.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 18, 2015 3:32 am

Web Title: rules and regulation driver
टॅग : Driver,Rules
Next Stories
1 मंत्री पार्क सोसायटीवर प्रशासक नेमण्याची मागणी
2 नवं ते सोनं.. : बजाज अ‍ॅव्हेंजर
3 आर टी ओ अंतरंग : वाहन चालवण्याचे विधिग्रा नियम
Just Now!
X