प्रीमियम कारच्या उत्पादनातील आघाडीची कंपनी असलेल्या होंडा मोटर्सने आता भारतातील उत्पादनात वाढ करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्या दृष्टीने राजस्थानातील तापुकारा येथे तब्बल साडेचारशे एकर जमिनीवर कारखाना उभारण्यात आला आहे. या कारखान्यातून उत्पादनाला सुरुवात झाली असून दरवर्षी एक लाख २० हजार गाडय़ा येथून बाहेर पडतील. राजस्थानातील हा पहिलावहिला कारनिर्मिती कारखाना आहे, हे विशेष. या नव्या कारखान्यातून होंडा अमेझ ही गाडी प्रथम उत्पादित होऊन बाहेर पडेल. गेल्या वर्षी कारविक्रीत होंडाने देशात दुसरा क्रमांक पटकावला. तिचा बाजारहिस्साही वाढीस लागला आहे. हंगामी अर्थसंकल्पात कारच्या उत्पादनावरील अबकारी करात कपात करण्यात आल्याने कारची विक्री वाढण्याची शक्यता आहे.
संग्रहित लेख, दिनांक 27th Feb 2014 रोजी प्रकाशित
होंडा कारचे उत्पादन आता राजस्थानात
प्रीमियम कारच्या उत्पादनातील आघाडीची कंपनी असलेल्या होंडा मोटर्सने आता भारतातील उत्पादनात वाढ करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

First published on: 27-02-2014 at 01:10 IST
मराठीतील सर्व Drive इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Honda starts production at new rajasthan plant