’मी व्यवसायाने डॉक्टर आहे. मला दररोज दहा ते १५ किमी प्रवास करावा लागतो. आधी मी १३ वष्रे सँट्रो कार वापरली. आता मला गाडी बदलायची आहे. मला पेट्रोलवर चालणारी गाडी घ्यायची असून माझे बजेट पाच ते सहा लाख रुपये आहे. मला डॅटसन गो आणि निस्सान मायक्रा या गाडय़ांविषयी सांगा किंवा तुम्ही मला कोणती गाडी सुचवाल?
 डॉ. स्वाती कोर्डे
’मी तुम्हाला ग्रँड आय१० ही गाडी सुचवेल. ती तुम्हाला सोयीस्कर ठरेल. शिवाय डॅटसन गो आणि निस्सान मायक्रा यांच्यापेक्षा अधिक आरामदायी आहे. हिचे १.२ लिटरचे इंजिन चांगले मायलेज देते. तसेच आय१० चे स्टर्डी डिझाइन तुम्हाला चांगले सस्पेन्शन देते.
’स्विफ्ट डिझायर (झेडडीआय) आणि आय २० एॅस्ट्रा १.४ डिझेल या दोन्ही गाडय़ांपकी कोणती गाडी चांगले फीचर्स, कम्फर्ट, मायलेज आणि कमी मेन्टेनन्ससाठी उत्तम राहील?
 तेजस पाटील
’कम्फर्ट म्हणाल तर तो आय२० मध्ये जास्त प्रमाणात मिळतो आणि फीचर्सही चांगले आहेत. तसेच सहा एअरबॅग्जही आहेत या गाडीत. तिचे १.४ डिझेल इंजिन जास्त पॉवरफुल आहे व लुकही स्पोर्टी आहे. व्हील बेसही चांगला आहे. त्यामुळे तुम्हाला आय२० घेणे चांगले ठरेल.
’माझे रोजचे ड्रायिव्हग २५ किमी आहे. कुटुंबात ६ व्यक्ती आहेत. मी फोर्ड इको-स्पोर्ट घ्यावी की डस्टर घ्यावी हे ठरवू शकत नाहीये. इतर कुठली गाडी घ्यावी का? कृपया कमी मेन्टेनन्स व अधिक मायलेज अशी तुलना करून सांगा.
दीपक देशपांडे
’२५ किमी प्रतिदिन म्हणजे खूप कमी रिनग आहे. इकोस्पोर्टला आणि डस्टर पेट्रोलला दोन्ही गाडय़ांना १० किमी प्रतिलिटर एवढाच मायलेज आहे. त्यामुळे जास्त मायलेज देऊ शकणाऱ्या व पेट्रोलवर चालणाऱ्या गाडय़ा म्हणजे होंडा जॅझ किंवा स्विफ्ट डिझायर. या दोन्हींपकी कोणतीही घ्या. उत्तम पर्याय आहे.
’सर, मला नुकतीच सरकारी नोकरी लागली आहे. मला इन्शुरन्स बेसिसवर गाडी घ्यायची आहे. आता माझ्याकडे दोन लाख रुपये आहेत. मला सात आसनी गाडी घ्यायची आहे. कोणती गाडी माझ्यासाठी सर्वोत्तम ठरेल.
प्रल्हाद होनराव
’सात आसनी पेट्रोल कार अर्टगिा ही एक चांगली गाडी आहे. तिचा मायलेजही उत्तम आहे आणि ती आरामदायीही आहे. दुसरा पर्याय शेवरोले एन्जॉय आहे.
’आम्ही फोर्ड इकोस्पोर्ट घेण्याचा विचार करत आहोत. आमच्या कुटुंबात सात जण आहोत. तुमचे फोर्ड इकोस्पोर्टबद्दल काय मत आहे? कृपया सांगावे.
– पल्लवी कोळंबीकर
’इकोस्पोर्टमध्ये तुम्हा पाच जणांनाच प्रवास करता येऊ शकेल. इकोस्पोर्ट चांगली कॉम्पॅक्ट एसयूव्ही आहे. तिचा ग्राऊंड क्लिअरन्सही चांगला आहे; परंतु तिचे १.५ लिटर इंजिन जास्त मायलेज देऊ शकत नाही. त्यापेक्षा तुम्ही डिझेलमधले टीडीसीआय हे मॉडेल घ्या. इकोस्पोर्ट खूप चांगली गाडी आहे. तुम्हाला सात आसनीच गाडी घ्यायची असेल, तर रेनॉ लॉजी ही गाडीही घेता येऊ शकेल.
या सदरासाठी तुमचे प्रश्न ls.driveit@gmail.com वर पाठवा.