देशभरात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान सुरु झाले आहे. दरम्यान, काही ठिकाणांहून मतदानादरम्यान तक्रारी यायला सुरुवात झाली आहे. उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगरचे भाजपाचे उमेदवार संजीव बालियान यांनी त्यांच्या मतदारसंघात बनावट मतदान होत असल्याचा आरोप केला आहे.


मतदानासाठी बुऱखा घालून आलेल्या महिलांची पडताळणी न करताच त्यांना मतदानासाठी मतदान केंद्रात पाठवले जात आहे, त्यामुळे बनावट मतदान होत असल्याचा आरोप बालियान यांनी केला आहे. जर हा प्रकार थांबवला गेला नाही तर आपण येथे दुबार मतदानाची मागणी करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

पश्चिम उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर जागा ही पहिल्या टप्प्यातील सर्वाधिक हायप्रोफाईल जागांपैकी एक आहे. येथे दोन माजी केंद्रीय मंत्री संजीव बालियान आणि अजित सिंह यांच्यामध्ये मुख्य लढत होत आहे.