राम मंदिराच्या निर्माणासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करु. लवकरात लवकर राम मंदिर बांधण्यासाठी प्रयत्न करु. राम मंदिर बांधण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह सोमवारी भाजपाच्या जाहीरनामा प्रकाशनाच्यावेळी म्हणाले.

राम मंदिर बांधण्यासाठी भाजपा सरकार शक्य असेल ते सर्व काही करेल असे राजनाथ सिंह म्हणाले. अयोध्येत भव्य राम मंदिराच्या निर्माणासाठी संविधानाच्या चौकटीत राहून शक्य असेल ते सर्व प्रयत्न करु असे राजनाथ सिंह म्हणाले.

भाजपाने आपल्या निवडणूक जाहीरनाम्याला संकल्प पत्र म्हटले असून ‘संकल्पित भारत, सशक्त भारत’ असे नाव दिले आहे. या जाहीरनामा प्रकाशनाला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपाचे सर्व वरिष्ठ नेते उपस्थित आहेत.