News Flash

VIDEO: भर सभेत हार्दिक पटेल यांच्या कानशीलात लगावली

भाषण देण्यासाठी पटेल मंचावर उभे असताना घडला प्रकार

हार्दिक पटेल यांच्यावर झाला हल्ला

गुजरातमधील काँग्रसचे नेते  हार्दिक पटेल यांना जाहीर सभेमध्ये एका व्यक्तीने कानशीलात लगावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुरेंद्रनगर मतदारसंघातील बढवान येथे पटेल यांच्या सभेमध्ये हा प्रकार घडला. भाषण देण्यासाठी पटेल मंचावर उभे राहून आपले म्हणणे मांडत असतानाच एका व्यक्तीने तिथे येऊन त्यांच्या कानशीलात लगावली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळ पटेल गोंधळले. मंचावरील इतरांनी त्या इसमाला पडले.

एएनआयने पोस्ट केलेल्या या व्हिडीओमध्ये हार्दिक पटेल गुजरातीमधून स्थानिकांशी संवाद साधताना दिसत आहेत. पटेल यांचे भाषण सुरु असताना अचानक एक व्यक्ती त्यांच्या उजव्या गालावर जोरदार फटका मारत त्यांच्यावर ओरडते. अचानक झालेल्या हल्ल्याने गोंधळलेले पटेल बाजूला झाले. मंचावरील इतरांनी या व्यक्तीला पकडून कपडे फाटेपर्यंत त्याला मारहाण केली. या प्रकरानंतर पुढे बोलताना हार्दिक यांनी ‘भाजपावाले मला ठार मारु इच्छितात. हेच लोक माझ्यावर हल्ले करत आहेत. पण मी गप्प बसणार नाही’, असं मत व्यक्त केलं आहे.

पोलिसांनी या व्यक्तीला ताब्यात घेत त्याची हार्दिक समर्थकांपासून सुटका केली. मारहाण करण्यात आलेल्या या व्यक्तीला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची परिस्थिती गंभीर आहे. या प्रकरणाची पोलीस चौकशी करत आहे.

काल दिल्लीमधील एका कार्यक्रमामध्ये भाजपाच्या प्रवक्त्यांवर एका व्यक्तीने चप्पल भिरकावली होती. हे प्रकरण ताजे असतानाच आज पटेल यांच्यावर हा हल्ला झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 19, 2019 12:31 pm

Web Title: congress leader hardik patel slapped during a rally in surendranagar gujarat
Next Stories
1 हेमंत करकरेंच्या हत्येस माझा शाप कारणीभूत; साध्वी प्रज्ञा सिंहांचं वादग्रस्त विधान
2 VIDEO: ‘चुनाव का महिना राफेल करे शोर..’; आव्हाडांची मोदी सरकारवर गाण्यातून टिका
3 राज ठाकरेंनी दिलेला आदेश आमच्यासाठी अंतिम, मनसे कार्यकर्त्यांनी व्यक्त केली भावना
Just Now!
X