News Flash

काँग्रेस कार्यकर्तेही माझ्याबरोबर: नितीन गडकरी

काँग्रेसचे कार्यकर्ते मला फोन करत आहेत. ते माझ्या विजयाबाबत निश्चिंत असून ते माझ्याबरोबर आहेत.

नितीन गडकरी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काँग्रेस कार्यकर्तेही आपल्याबरोबर असल्याचा दावा केला आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांचे मला समर्थन असून ते फोन करून मला पाठिंबा देत आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघातून माझ्या विजयाबाबत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनाही विश्वास आहे. काँग्रेस कार्यकर्ते भलेही माझा प्रचार करत नसले तरी ते मनाने माझ्यासोबत आहेत, असेही गडकरी म्हणाले.

ते नागपूर येथील एका प्रचारसभेत बोलत होते. ते म्हणाले, काँग्रेसचे कार्यकर्ते मला फोन करत आहेत. ते माझ्या विजयाबाबत निश्चिंत असून ते माझ्याबरोबर आहेत. ते भलेही औपचारिकरित्या काँग्रेसचा प्रचार करत असले तरी मानसिकरित्या ते माझ्याबरोबर आहेत.

विशेष म्हणजे, गडकरी हे आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध आहेत. यापूर्वीही त्यांनी मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड निवडणुकीतील भाजपाच्या पराभवानंतर त्यांनी याची जबाबदारी पक्ष नेतृत्वाने घ्यायला हवी असे म्हटले होते. त्याचबरोबर नेत्यांनी अशी स्वप्ने दाखवायला हवीत जी पूर्ण करता येतील. नाहीतर जनता याचा बरोबर वचपा काढते, असे म्हटले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2019 10:40 am

Web Title: lok sabha election 2019 congress party worker with me says nitin gadkari bjp
Next Stories
1 बॉलिवूड भीतीपोटी नरेंद्र मोदींना समर्थन देत आहे – प्रिया दत्त
2 दहशतवाद्यांना चीनकडून संरक्षण, ही दांभिकता जगाला परवडणारी नाही; अमेरिकेने खडसावले
3 मॉर्निंग बुलेटीन : पाच महत्त्वाच्या बातम्या
Just Now!
X