लोकसत्ता लोकज्ञान

लोकसभेच्या ५४२ मतदारसंघांची मतमोजणी उद्या होणार आहे. तमिळनाडूतील वेल्लोर मतदारसंघातील निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. उद्या ८,०३९ उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे. यंदा प्रथमच लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघनिहाय प्रत्येकी पाच मतदानयंत्रे आणि त्याबरोबरच मतपावत्यांची (व्हीव्हीपॅट) मोजणी केली जाणार आहे. यानुसार महाराष्ट्रात प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील ३० मतपावत्यांची मोजणी केली जाईल. सध्या मतदानयंत्रांच्या सुरक्षेबाबत विरोधकांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. उत्तर प्रदेश, बिहारमध्ये मतदान यंत्रांच्या सुरक्षेवरून विरोधक रस्त्यावर उतरले. विरोधकांनी ५० टक्के मतपावत्यांच्या मोजणीची मागणी केली होती. पण निवडणूक आयोगाने त्याला विरोध केला होता. सर्वोच्च न्यायालयाने विरोधकांची मागणी फेटाळून लावली असली तरी याआधी प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय एका मतपावती यंत्राची मोजणी होत असे. त्यात वाढ करून ही संख्या पाच करण्यात आली आहे.

Adolf Hitler
Adolf Hitler: नरेंद्र मोदी सरकारने मान्य केलेल्या ‘आर्यां’चे हिटलरलाही आकर्षण होते, नेमकं कारण काय?
Bengluru
VIDEO : ‘जय श्री राम’ म्हटल्याने बंगळुरूमध्ये तिघांवर हल्ला, झेंडाही पळवला
Loksatta explained The constructions of Pradhan Mantri Awas Yojana have not been completed
विश्लेषण: पंतप्रधान आवास योजनेची गती का मंदावली?
The district administration announced the list of campaign materials along with food items in the list fixed to account for Lok Sabha election expenses pune
जिल्हाधिकाऱ्यांनी पुण्यात आणली ‘स्वस्ताई’; जाणून घ्या कशी?

मतदानयंत्रे कुठे ठेवली जातात ?

* मतदानयंत्रे ही सुरक्षित जागी (स्ट्राँगरूम) ठेवली जातात. या जागेच्या बाहेर उमेदवारांच्या प्रतिनिधींना २४ तास पहारा ठेवण्याची मुभा दिली जाते. मतदान पार पाडल्यावर मतदानयंत्रे ही सुरक्षित ठिकाणी आणली जातात. मतदान केंद्र ते मतदानयंत्रे ठेवण्याच्या जागेपर्यंत नेताना उमेदवारांच्या प्रतिनिधींना मागील वाहनातून प्रवास करण्यास परवानगी दिली जाते. मतदान केंद्रातून ही यंत्रे आणल्यावर नक्की किती मतदान झाले वा मतदानयंत्रांमध्ये किती मतांची नोंद झाली याची आकडेवारी उमेदवारांना दिली जाते. यानंतर मतदानयंत्रे ठेवण्याची जागा सील केली जाते. हे सील मतमोजणीच्या दिवशी सकाळी काढले जाते. मधल्या काळात सील काढण्याची परिस्थिती उद्भवल्यास उमेदवारांच्या उपस्थितीत ती उघडली जातात. मतदानयंत्रे ठेवलेल्या जागेच्या परिसरात सीसीटीव्ही लावले जातात.

मतपावत्यांची मोजणी कशी केली जाणार?

* मतदानप्रक्रिया अधिक पारदर्शी व्हावी या उद्देशानेच मतपावत्यांची तरतूद २०१३ मध्ये करण्यात आली होती. आधी काही मतदानकेंद्रांवर ही यंत्रे बसविली जात. या वेळी सर्व मतदान केंद्रांवरील प्रत्येक मतदानयंत्रासमावेत हे यंत्र बसविण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाने लोकसभा मतदार संघातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघांतील पाच मतपडताळणी किंवा मतपावत्या असलेल्या यंत्रांची मोजणी करण्याचा आदेश दिला आहे. देशात काही राज्यांमध्ये एका लोकसभा मतदारसंघात पाच तर काही ठिकाणी दहापर्यंत विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. महाराष्ट्रात प्रत्येक लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. मतदानयंत्रांची मोजणी पूर्ण झाल्यावर पाच मतदानयंत्रांची लॉटरीच्या माध्यमातून निवड केली जाईल.

मतपावत्या आणि मतदानयंत्रांमधील मतांमध्ये फरक आढळल्यास कोणती मते ग्राह्य़ धरली जाणार ?

* मतदानयंत्रांची मोतमोजणी सुरू करण्यापूर्वी मतपावत्यांची मोजणी करण्याची मागणी २२ विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाकडे केली होती. पण निवडणूक आयोगाने ही मागणी फेटाळून लावली. मतदानयंत्रांची मोजणी पूर्ण झाल्यावरच मतपावत्यांची मोजणी केली जाईल. मतदानयंत्रे आणि मतपावत्यांमधील मतांमध्ये फरक किंवा भिन्नता आढळल्यास मतपावत्यांमध्ये मिळालेली मते ही अंतिम निकालात ग्राह्य़ धरली जातील, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

प्रत्यक्ष मतमोजणी कशी केली जाते ?

* मतमोजणीच्या दिवशी सकाळी मतदानयंत्रे ठेवलेल्या जागेचे सील उमेदवार, निवडणूक निर्णय अधिकारी आणि निवडणूक आयोगाने नेमलेल्या निरीक्षकांच्या उपस्थितीत काढले जाते. मतदान यंत्रे (कंट्रोल युनिट) मतमोजणीच्या ठिकाणी आणली जातात. मतमोजणी करण्यापूर्वी मतदानयंत्रे आणि त्याबरोबर अधिकाऱ्यांची स्वाक्षरी असलेली कागदपत्रे उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींना दाखविली जातात. प्रत्यक्ष मतमोजणीला सकाळी आठ वाजता सुरुवात होईल. पोस्टल बॅलटची आधी मोजणी केली जाते. सरकारी अधिकारी, सैन्यदल, पोलीस किंवा निवडणूक कामाकरिता नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना पोस्टल बॅलेटच्या माध्यमातून मतदानाचा अधिकार बजाविता येतो. पोस्टल बॅलटची मतमोजणी पूर्ण झाल्यावरच साडे आठनंतर मतदान यंत्रांची मोजणी सुरू केली जाईल. ही मतमोजणी  मतदानयंत्राची कळ दाबल्यावर त्यात किती मतांची नोंद झाली याची आकडेवारी समजते. मतपत्रिकांच्या मोजणीपेक्षा मतदानयंत्रांची मोजणी लवकर पूर्ण होते. मतमोजणीसाठी १४ टेबल्स प्रत्येक मतमोजणी केंद्रांमध्ये ठेवली जाणार आहेत. उमेदवारांची संख्या आणि मतदारांची संख्या या आधारे किती फेऱ्यांमध्ये मतमोजणी केली जाईल. मतदानयंत्रे एकत्र करून मतमोजणी केली जाते.