11 August 2020

News Flash

उद्धव म्हणतात ‘लाव रे फटाक्यांची माळ’

घवघवीत यशानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित केले.

संग्रहित छायाचित्र

लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित केले. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंच्या प्रचाराची खिल्ली उडवली.

‘लाव रे व्हिडिओ’ ला ‘लाव रे फटाक्यांची माळने’ उत्तर मिळाले असे उद्धव म्हणाले. लोकसभेच्या या यशानंतर विधानसभेला कोण मोठा भाऊ असेल असा प्रश्न उद्धव यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी आमचे आम्ही ठरवू. विधानसभेच्या निकालानंतर पेढे खायला इथेच या असे उत्तर दिले.

मोठा भाऊ कोण ? देवेद्र फडणवीसांचे उत्तर
महायुती अभेद्य आहे. महाराष्ट्राच्या भल्यासाठी सर्व निवडणुका सोबत लढवू. मोदींची विश्वासाची परंपरा महायुती महाराष्ट्रात रुजवतेय असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. युतीमध्ये मोठा भाऊ कोण ? या प्रश्नावर फडणवीस यांनी उद्धव माझे मोठे भाऊ आहेत. मात्र मोदी हे उद्धव यांचे मोठे भाऊ आहेत असे उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले.

विरोधकांनी पराभव का झाला ? याचे आत्मपरीक्षण करावे. विरोधी पक्षांनी कार्यक्रम मांडला नाही. नकारात्मक प्रचारामुळे विरोधकांची ही स्थिती झाली. कोणाला दोष देण्याऐवजी का मत दिल नाही? याचं आत्मपरीक्षण करावे असे मुख्यमंत्री म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2019 5:57 pm

Web Title: loksabha election result 2019 shivsena chief uddhav thackeray slams mns chief raj thackeray
Next Stories
1 रजनीकांत मोदींना म्हणतात “करून दाखवलंत”
2 पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडून नरेंद्र मोदींचं अभिनंदन
3 हिना गावितांनी गड राखला, नंदुरबारमध्ये भाजपा विजयी
Just Now!
X