X
X

राज ठाकरेंनी दाखवलं देशातल्या पहिल्या कॅशलेस गावातील वास्तव

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाड येथील जाहीर सभेमध्ये व्हिडिओच्या माध्यमातून देशातल्या पहिल्या कॅशलेस गावातील धक्कादायक स्थिती दाखवून दिली

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाड येथील जाहीर सभेमध्ये व्हिडिओच्या माध्यमातून देशातल्या पहिल्या कॅशलेस गावातील धक्कादायक स्थिती दाखवून दिली. महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील धसई हे देशातील पहिले कॅशलेस गाव जाहीर झाले होते. पण आजही या गावामध्ये रोखीने व्यवहार चालतात.

गावात कॅशलेस व्यवहार होत नाहीत हे त्या गावातील लोकांनीच सांगितले. गावात एकच राष्ट्रीय बँक, एकच जिल्हा बँक आहे. पण गावातील लोकांकडे बॅक खातीच नाहीत. त्यामुळे लोकांकडे एटीएम कार्ड नाहीत. मग कॅशलेल व्यवहार होणार कसे ? त्यामुळे देशातील पहिल्या कॅशलेस गावावर रोखीने व्यवहार करण्याची वेळ आली आहे.

दिव्याखाली अंधार अशी कॅशलेस गावातील स्थिती आहे. राज ठाकरेंनी व्हिडिओ चित्रफितीच्या माध्यमातून हे धक्कादायक वास्तव दाखवून दिले.

लोकसभा निवडणूक न लढवताही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या भाषणांनी विरोधकांना घायाळ करुन सोडले आहे. सभेमध्ये मोदींच्या भाषणाचे जुने व्हिडिओ दाखवून मोदींनी पाच वर्षांपूर्वी दिलेली आश्वासन आणि आताची प्रत्यक्ष परिस्थिती यामधील फरक ते मतदारांना दाखवून देत आहेत. मतदारांनाही प्रचाराची त्यांची ही नवी पद्धत प्रचंड भावली आहे.

21
First Published on: April 19, 2019 8:44 pm
  • Tags: लोकसभा निवडणूक २०१९,