21 September 2020

News Flash

जळगावातल्या भडगावातील एका केंद्रावर सोमवारी पुन्हा मतदान

भडगावातल्या केंद्रावर ५० मतं नष्ट करण्यात आल्याचा प्रकार घडला होता

प्रतिकात्मक छायाचित्र

लोकसभेच्या जळगाव मतदारसंघात 23 तारखेला पार पडलेल्या निवडणुकीत भडगाव शहरातील 107 क्रमांकाच्या केंद्रावर मॉकपोलनंतर मतदान यंत्रात पडलेली जवळपास ५० मतं नष्ट करण्यात आली नव्हती. तसेच तीन मते अतिरिक्त आढळली होती. या प्रकाराची गंभीर दखल घेऊन निवडणूक आयोगाने सदर केंद्रावर सोमवारी पुन्हा मतदान घेण्याचे आदेश काढले आहेत.

पाचोरा विधानसभा मतदारसंघात समाविष्ठ असलेल्या भडगाव शहरातील 107 क्रमांकाच्या मतदान केंद्रावर आढळून आलेली 53 मते व्हीव्हीपॅटचा वापर झाल्याने काढून टाकता आली नाहीत. माॅकपोल दरम्यान पडलेली जास्तीची मते मतदानाची प्रक्रिया आटोपल्यानंतरच लक्षात आली होती. निवडणूक आयोगाकडे त्यासंदर्भात अहवाल पाठविण्यात आल्यानंतर जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दोषी मतदान केंद्राध्यक्ष उद्धवराव पाटील आणि मतदान अधिकारी सुनीता देवरे यांना निलंबित सुद्धा केले आहे.

आता निवडणूक आयोगाने भडगाव शहरातील त्या केंद्रावर पुन्हा मतदान घेण्याचे आदेश काढले आहेत. विशेष म्हणजे यावेळी 23 तारखेला नियुक्त अधिकारी व कर्मचारी वगळून पूर्णतः नवीन पथक त्याठिकाणी नियुक्त करावे, असेही निवडणूक आयोगाने नव्या आदेशात म्हटले आहे. त्यानुसार सोमवारी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेदरम्यान भडगाव शहरातील त्या केंद्रावर पुन्हा मतदानाची प्रक्रिया होणार आहे. लोकसभेच्या रिंगणातील उमेदवारांसह त्यांच्या प्रतिनिधींनाही त्याअनुषंगाने परत तयारी करावी लागणार आहे. संबंधित मतदान केंद्राध्यक्ष व एका महिला कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे जिल्ह्यातील निवडणूक यंत्रणेलाही त्यामुळे परत सर्व धावपळ करावी लागणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 27, 2019 4:38 pm

Web Title: revoteing in bhadgaon one centre in jalgaon says election commission
Next Stories
1 शिवबंधनात अडकलेल्या प्रियंका चतुर्वेदी यांची उपनेतेपदी नियुक्ती
2 पार्थ पवारांच्या प्रचारासाठी नवनीत राणा कौर लोणावळ्यात
3 पालघरच्या गुंडांना धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाही-उद्धव ठाकरे
Just Now!
X