26 September 2020

News Flash

शिवबंधनात अडकलेल्या प्रियंका चतुर्वेदी यांची उपनेतेपदी नियुक्ती

मागच्या आठवडयात प्रियंका चतुर्वेदी यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत प्रवेश केला होता.

शिवसेनेत प्रियंका चतुर्वेदी यांची उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मागच्या आठवडयात प्रियंका चतुर्वेदी यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत प्रवेश केला होता. पत्रकार परिषदेत असभ्य वर्तन केल्याच्या आरोपावरून निलंबित करण्यात आलेल्या आठ पदाधिकाऱ्यांना पुन्हा काँग्रेसमध्ये घेण्याचा निर्णय प्रियंका चतुर्वेदी यांना पटला नव्हता. टि्वटरवरुन त्यांनी आपली नाराजीही व्यक्त केली होती. अखेर त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली.

पक्षासाठी घाम गाळणाऱ्या आणि रक्त आटवणाऱ्यांना काँग्रेसमध्ये किंमत नाही, गुंडांना मात्र मान मिळतो, अशा आशयाचे ट्वीट चतुर्वेदी यांनी केले होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी ‘मातोश्री’वर चतुर्वेदी यांना शिवबंधन बांधून पक्षप्रवेश दिला. त्यांच्या रूपाने आपल्याला चांगली बहीण मिळाली असून त्यांच्या बुद्धीचा देशाला आणि महाराष्ट्रास उपयोग होईल, असेही ते म्हणाले.

मुंबई ही माझी जन्मभूमी व कर्मभूमी असून लहानपणापासूनच आपल्याला शिवसेनेविषयी आत्मीयता आहे, असे प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या होत्या. महिलांच्या हक्कांसाठी आपल्याला माध्यमातून काम करावयाचे असून त्यासाठी शिवसेना हाच योग्य पक्ष आहे, अशा शब्दांत त्यांनी पक्षप्रवेशाच्या वेळी आपले मनोगत व्यक्त केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 27, 2019 4:31 pm

Web Title: shiv sena has appointed priyanka chaturvedi as the upneta
Next Stories
1 पार्थ पवारांच्या प्रचारासाठी नवनीत राणा कौर लोणावळ्यात
2 पालघरच्या गुंडांना धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाही-उद्धव ठाकरे
3 बावखलेश्वर मंदिर प्रश्नी शिवसेना राष्ट्रवादीविरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार करणार
Just Now!
X