Amit Shah : देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी सोहळा मुंबईतल्या आझाद मैदानावर पार पडणार आहे. संध्याकाळी ५.३० वाजता या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. आझाद मैदानावर यासाठी जय्यत तयारीही सुरु आहे. दरम्यान एकनाथ शिंदे यांना अमित शाह ( Amit Shah ) हे शपथविधीच्या आधी भेटणार आहेत अशी माहिती आता समोर आली आहे.

देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी संध्याकाळी ५.३० वाजता

देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आज बुधवार ५ डिसेंबर २०२४ ला संध्याकाळी ५.३० वाजता शपथ घेतील. महाराष्ट्राला देशातलं क्रमांक एकचं राज्य करण्याची क्षमता ज्या व्यक्तीमध्ये आहे असे लोकनेते देवेंद्र फडणवीस हे आज मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. महाराष्ट्राच्या १४ कोटी जनतेला आम्ही जो जाहीरनामा दिला होता त्यातली वचनं यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. देवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत आहेत मी त्यांना शुभेच्छा देतो असंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ( Amit Shah ) हे आज एकनाथ शिंदे यांची भेट घेतील अशी सूत्रांची माहिती आहे.

Eknath Shinde , Rickshaw ,
VIDEO : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हाती पुन्हा रिक्षाचे स्टेरिंग, शिंदे यांनी दिला जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Pratap Sarnaik Thackeray Group
Pratap Sarnaik : उद्धव ठाकरेंना मुंबईत धक्का बसणार? शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “ठाकरे गटाचे…”
possibility of Eknath Shinde and Ganesh Naik coming together in municipal elections is less
महायुतीच्या संकेतांना नवी मुंबईत खोडा? महापालिका निवडणुकीत शिंदे- नाईक मनोमिलनाची शक्यता धुसरच
Eknath shinde
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून महायुतीचे संकेत, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीत लढल्या जाणार
What Eknath Shinde Said?
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला, “सरडाही रंग बदलतो, पण अशी नवी जात…”
eknath shinde shivsena
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात, “सर्व पक्षांनी एकच रस्ता धरलाय, तो म्हणजे धनुष्यबाणाची शिवसेना”
forest minister ganesh naik slams eknath shinde working style during cm tenure
शिंदेशाहीतील चुकांची उजळणी करत नाईकांचे वर्चस्वाचे संकेत

हे पण वाचा- Devendra Fadnavis Oath : देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीचं उद्धव ठाकरे, शरद पवारांना निमंत्रण; चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “सगळ्यांनी…”

अमित शाह एकनाथ शिंदेंना भेटणार?

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ( Amit Shah ) हे एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत अशी माहिती सूत्रांच्या हवाल्याने कळते आहे. महायुतीला महाप्रचंड बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार? यावर अनेक दिवस खल चालला. अखेर एकनाथ शिंदे यांनी नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पत्रकार परिषद घेऊन अमित शाह आणि नरेंद्र मोदी जो निर्णय घेतील तो मान्य असेल असं सांगितलं. आता शपथविधी सोहळ्याच्या आधी अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांची भेट झाल्यास त्यात काय चर्चा होईल? हे पाहणं नक्कीच महत्त्वाचं असणार आहे. एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री हे पद मागितल्याची चर्चा आहे. दरम्यान अमित शाह ( Amit Shah ) शिवसेनेला कुठली खाती द्यायची याची चर्चा एकनाथ शिंदेंशी करु शकतात अशीही माहिती समोर आली आहे. या भेटीचे तपशील समोर आलेले नाहीत. दरम्यान ही भेट झाली तर ती महत्त्वाची ठरणार आहे हे नक्की.

महाराष्ट्रात महायुती आणि मविआचं बलाबल कसं आहे?

महायुतीला २३७ जागा
मविआ-४९ जागा
अपक्ष आणि इतर-२ जागा

महाराष्ट्रात महायुतीत कुणाला किती जागा आहेत?

भाजपा १३२ आमदार विजयी
शिवसेना (एकनाथ शिंदे)- ५७ आमदार विजयी
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) ४१ जागा विजयी

Story img Loader