राज्याच्या निवडणुकीच्या दोन दिवस आधी, उत्तराखंडचे मुख्यमंत्री आणि भाजपा नेते पुष्कर सिंह धामी यांनी घोषित केलं की जर त्यांच्या पक्षाने राज्यात सत्ता कायम ठेवली तर, सरकार लवकरच उत्तराखंड मध्ये समान नागरी संहितेचा मसुदा तयार करण्यासाठी एक समिती स्थापन करेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“आपल्या शपथविधीनंतर लवकरच, नवीन भाजपा सरकार राज्यात समान नागरी संहितेचा मसुदा तयार करण्यासाठी एक समिती स्थापन करेल. यामुळे लग्न, घटस्फोट, जमीन-मालमत्ता आणि सर्व लोकांसाठी वारसा यासंबंधी समान कायदे प्रदान करेल, असा विश्वास आहे,” असं मुख्यमंत्री धामी यांनी एएनआयशी बोलताना सांगितलं.

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सांगितलं की, “उत्तराखंडमध्ये लवकरात लवकर समान नागरी संहिता लागू केल्याने राज्यातील प्रत्येकासाठी समान अधिकारांना चालना मिळेल. यामुळे सामाजिक सौहार्द वाढेल, लैंगिक न्याय वाढेल, महिला सक्षमीकरण मजबूत होईल आणि सांस्कृतिक संरक्षणास मदत होईल.” या घोषणेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बीएल संतोष यांनी ट्विट केलं, “उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा… हे खूप मोठे पाऊल आहे.”

उत्तराखंड विधानसभा निवडणूक २०२२ एकाच टप्प्यात १४ फेब्रुवारी रोजी होणार आहे. मतमोजणी १० मार्च रोजी होणार आहे. उत्तराखंडमधील शेवटच्या विधानसभा निवडणुका (२०१७ मध्ये) एकाच टप्प्यात झाल्या, ज्यामध्ये भारतीय जनता पक्षाने राज्याच्या ७० विधानसभा मतदारसंघांपैकी ५७ जागा जिंकल्या. यावेळी, उत्तराखंड विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजप, काँग्रेस आणि अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीमध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व उत्तराखंड विधानसभा निवडणूक २०२२ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp uniform civil code uttarakhand elections 2022 cm dhami vsk
First published on: 12-02-2022 at 13:35 IST