मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. शिवसेनेचे नेते दिवंगत आनंद दिघे यांची लोकप्रियता सलत असल्यामुळे त्यांना पदावरून बाजूला करण्याचे कारस्थान आणि डाव होता, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री शिंदेंनी केला. तसेच त्यांना मातोश्रीने पद सोडायला सांगितले होते, असेही शिंदे यांनी म्हटले. मुख्यमंत्र्यांच्या या टीकेला ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर देत खोटारड्यांना मी उत्तर देत नाही, असा टोला लगावला होता. यानंतर पुन्हा मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना थेट इशारा दिला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आनंद दिघे यांच्याबाबत उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केल्यानंतर आदित्य ठाकरे प्रत्युत्तर देताना म्हणाले, “एकनाथ शिंदे म्हणून २२ वर्ष शिवसेनेत होते. सर्व पदे त्यांनी भोगले आहेत. मी खोटारड्यांना उत्तर देत नाही. त्यांनी जी पदे घ्यायची होती, ती सर्व पदे अगदी मंत्रिपदापर्यंत सर्व पदे घेतली. त्यामुळे अशा व्यक्तींना आम्ही उत्तर द्यायचं का?” अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना हल्लाबोल केला. “माझ्याकडे अजून बरंच काही आहे. मी जर बोललो जर ते पळून जातील”, असा सूचक इशारा एकनाथ शिंदे यांनी दिला.

Eknath shinde and nitish kumar
“४०० पारच्या घोषणेमुळे गडबड झाली”; एकनाथ शिंदेंच्या वक्तव्यानंतर जदयू नेते म्हणाले, “निवडणुकीत…”
Shiv Sena state coordinator Rameshwar Paval demanded cm Eknath Shinde give chance to Dr Srikant Shinde and Prataprao Jadhav
अकोला : केंद्रीय मंत्रिपदाची माळ कुणाच्या गळ्यात? शिवसेना शिंदे गटाकडून…
Dr Srikant Shinde as group leader of Shiv Sena
डॉ. श्रीकांत शिंदे शिवसेनेच्या गटनेतेपदी
Modi attacks congress in himachal pradesh
मदत निधीच्या आरोपावरून भाजपा-काँग्रेसमध्ये जुंपली; पंतप्रधान मोदींच्या दाव्यात किती सत्य?
Rohit pawar on Tanaji Sawant
“भ्रष्टाचाराच्या खेकड्याने आता नांग्या…”, अधिकाऱ्याच्या पत्रावरून रोहित पवारांची शिंदेंच्या मंत्र्यांवर टीका
cm ekanath shinde inquired earnestly about the health of MLA P N Patil
मुख्यमंत्र्यांकडून आमदार पी. एन. पाटील यांच्या तब्येतीची आस्थेवाईकपणे विचारपूस
anil deshmukh
“देवेंद्रजी, आता तुम्हीच सांगा आम्ही गृहमंत्र्यांचा राजीनामा का नाही मागायचा?” ‘त्या’ विधानावरून अनिल देशमुखांचा सवाल!
Devendra Fadnavis Letter to Voters
देवेंद्र फडणवीसांचे मतदारांना खुले पत्र, “लोकशाहीच्या उत्सवात मतदारांच्या मनामनात मोदी, ४ जूननंतर..”

हेही वाचा : उर्जामंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भाषणात बत्तीगुल, भर मंचावर अंधार झाल्यावर म्हणाले, “हमको रोक सके किसी अंधेरेमें…”

मुख्यमंत्री शिंदेंनी काय आरोप केले होते?

“आनंद दिघे यांच्याकडून जिल्हाप्रमुख पद काढून टाकण्याचा उद्धव ठाकरे यांचा डाव होता. तसेच त्यांची तर आनंद दिघे यांची प्रॉपर्टी कुठे कुठे आहे?, असा प्रश्नही उद्धव ठाकरे यांनी आपल्याला विचारला होता. त्यांची लोकप्रियता वाढली होती. पण त्यानंतर त्यांना राजीनामा सांगण्यात आले होते. मात्र, त्यानंतर ठाण्यासह अजून काही जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी पक्ष सोडण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे पुढे राजीनामा घेतला नाही. पण आनंद दिघे यांची लोकप्रियता त्यांना सलत असल्याने त्यांना पदावरून बाजूला करण्याचे कारस्थान होते”, असा आरोप मुख्यमंत्री शिंदे यांनी केला होता.

दरम्यान, सध्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु असून राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगला आहे. या निवडणुकीच्या प्रचारामध्ये आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण पाहायला मिळत आहे. सध्या संभांचा धडाका सुरु असून राजकारण तापले आहे. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या आरोपाला आदित्य ठाकरे यांनी उत्तर दिल्यानंतर पुन्हा मुख्यमंत्री शिंदे यांनी इशारा दिला आहे.