देशभरात लोकसभा निवडणुकीची धामधुम सुरू असताना विरोधक-सत्ताधारी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. मात्र काही वेळा कमरेखालची टीका झाल्यामुळे वादही निर्माण होतात. कर्नाटकमध्ये परंपरागत विरोधकांमध्ये सध्या असाच एक वाद सुरू आहे. बेळगाव ग्रामीणचे भाजपा पक्षाचे माजी आमदार संजय पाटील यांनी विद्यमान आमदार आणि कर्नाटकच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यावर अश्लाघ्य टीका केली आहे. शनिवारी एका जाहीर सभेत बोलत असताना संजय पाटील यांनी हेब्बाळकर यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले.

त्यांना एक जास्तीचा पेग घ्यावा लागत असेल

बेळगावमधील हिंडलगा येथे शनिवारी (दि. १३ एप्रिल) भाजपाचा मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यात संजय पाटील म्हणाले, “बेळगाव मतदारसंघात भाजपाला महिलांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे काँग्रेस आणि मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांना धडकी भरली आहे. त्यांना रात्रीची झोपही लागत नसेल. तसेच माजी मंत्री रमेश जारकीहोळी आमच्याबरोबर आहेत. त्यामुळे रात्री झोप लागण्यासाठी हेब्बाळकर यांना एक पेग जास्तीचा घ्यावा लागत असेल.”

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ex bjp mla sanjay patil make derogatory statement on karnataka minister lakshmi hebbalkar kvg
First published on: 14-04-2024 at 20:46 IST