Gujarat Exit polls Updates, 8 December 2022 : संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला आहे. गुजरातमध्ये सलग सातव्यांदा भाजपाचं सरकार येणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. भाजपाने ऐतिहासिक कामगिरी केली असून १८४ पैकी १५८ जागा जिंकण्याच्या मार्गावर आहे. काँग्रेसचा मात्र दारुण पराभव झाला आहे. काँग्रेसला फक्त १६ ते २० जागांवर विजय मिळण्याती शक्यता आहे. दुसरीकडे आक्रमक प्रचाराद्वारे मोठी हवा निर्माण केलेल्या ‘आप’ला मात्र तीन ते दोन अंकी आकडा गाठणंही कठीण आहे. बहुमतासाठी ९२ जागा जिंकणं आवश्यक आहे.

या निवडणुकीत भाजपा आपला २००२ मधील १२७ जागांचा तसंच काँग्रेसचा १९८५ मधील १४९ जागांचा रेकॉर्ड मोडण्याच्या मार्गावर आहे. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर झालेल्या या निवडणुकीत मतदारांकडून मिळालेल्या सहानुभूतीमुळे काँग्रेसचा ऐतिहासिक विजय झाला होता.

एक्झिट पोलनुसार गुजरातमध्ये भाजपाला १८२ जागांपैकी ११७ ते १५१ जागा आणि काँग्रेससह त्याच्या मित्रपक्षांना १६ ते ५१ जागा मिळतील, असा अंदाज होता.

Live Updates

Gujarat Assembly Election Result 2022 Live Counting Updates : गुजरातमध्ये भाजपाचा ऐतिहासिक विजय, काँग्रेसचा रेकॉर्ड काढला मोडीत

07:49 (IST) 8 Dec 2022
Gujarat Election Results 2022 : भाजपाला १३५ ते १४५ जागा निश्चितपणे मिळणार, हार्दिक पटेल यांचा दावा

भाजपाला १३५ ते १४५ जागा निश्चितपणे मिळणार आणि आम्हीच सरकार स्थापन करणार आहोत. कोणाला काही शंका आहे का? हार्दिक पटेल यांना विश्वास

गुजरात विधानसभा निवडणुकीचे निकाल घोषित होत आहेत. आता गुजरातमध्ये भाजपा, काँग्रेस की आप जिंकणार हे हळूहळू स्पष्ट होत आहे.